आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमपुरी म्हणाले होते, नसीरुद्दीन आणि माझ्यात फरक, शेंगा खरेदी करण्‍यासायाठीही मला मेहनत करावी लागली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'घाशीराम कोतवाल' हा मराठी चित्रपट ओम पुरींचा पहिला चित्रपट आहे. - Divya Marathi
'घाशीराम कोतवाल' हा मराठी चित्रपट ओम पुरींचा पहिला चित्रपट आहे.
नवी दिल्‍ली - वयाच्‍या 66व्‍या वर्षी ओमपुरी यांचे हद्यविकाराच्‍या धक्‍याने निधन झाले आहे. मोठे स्‍टार बनण्‍याअगोदर ओम पुरी यांना खुप संघर्ष करावा लागला. आयुष्‍याच्‍या सुरवातीच्‍या काळात खूप संघर्ष करावा लागल्‍याचे त्‍यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. ओम पुरी यांना अभिनयाची पहिली संधी मराठी चित्रपट घाशीराम कोतवाल मध्‍ये मिळाली. आक्रोश आणि अर्धसत्‍य या चित्रपटानीं त्‍यांना बॉलिवुडमध्‍ये ओळख मिळवून दिली. नसीरुद्दीन शहा यांच्‍याबद्दल बोलताना ओमपुरी एकदा म्‍हणाले होते, 'माझ्यात आणि नसीरमध्‍ये बराच फरक आहे. माझ्यावर घरातील जबाबदाऱ्यांचे ओझे होते. शेंगा खरेदी करायलाही मला मेहनत करावी लागत असे. कधी कधी तर रेल्‍वे रुळावरील कोळसा जमा करण्‍याचेही काम मला करावे लागले.'
 
ओमपुरींचा खडतर प्रवास
- ओमपुरींचा जन्‍म अत्‍यंत गरीब कुटुंबात झाला होता. 
- बालपणापासूनच ओमपुरींना जगण्‍यासाठी संघर्ष करावा लागला आहे. 
- 5 वर्षाचे असताना, रेल्‍वे रुळावरील कोळसा गोळा करण्‍याचे काम ते करीत असे. 
- 7 वर्षाचे झाल्‍यावर त्‍यांनी हॉटेलमध्‍ये ग्लास धुण्‍याचे काम केले आहे.
- त्‍यांनी आपले शालेय शिक्षण सरकारी शाळेतून पूर्ण केले. यादरम्‍यानही त्‍यांना मिळेल ते काम करावे लागत असे. 
- महाविदयालयात गेल्‍यावर त्‍यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. 
- एनएसडीमध्‍ये अभिनयाचे प्राथमिक शिक्षण घेतल्‍यानंतर त्‍यांनी एफटीआयआयमध्‍ये अभिनयाचा कोर्स पूर्ण केला.
- यानंतर बॉलिवुडमध्‍ये करिअर करण्‍यासाठी त्‍यांनी मुंबईची वाट धरली आणि हळुहळू टेलिव्हिजन, कलात्‍मक चित्रपट, हिंदी चित्रपट आणि हॉलिवुडपर्यंत त्‍यांनी मजल मारली. 
- आज ओम पुरी यांना जगभरात गुणवान अभिनेता म्‍हणून ओळखले जाते. 
- ओम पुरी यांनी रिचर्ड एटनबरो यांच्‍या 'गांधी' , 'ईस्‍ट इज ईस्‍ट', 'सिटी ऑफ जॉय' आणि 'जिया-उल-हक' सारख्‍या प्रसिध्‍द हॉलिवुड चित्रपटात महत्‍वाच्‍या भुमिका साकारल्‍या आहेत. 
-  ओम पुरी यांच्‍याबद्दल नसीरुद्दीन शहा एकदा म्‍हणाले होते, 'ओमप्रकाश पुरी ते ओम पुरी बनण्‍याच्‍या पुर्ण प्रवासाचा मी साक्षीदार राहिलेलो आहे. एक खडबडीत चेहऱ्याचा, सडपातळ तरुण ज्‍याच्‍या डोळयामध्‍ये भूख आणि पोलादी ध्‍येय दिसत होते. एक स्‍टोव्‍ह, एक सॉसपिन आणि काही पुस्‍तकांसहित एका खोलीत राहणारा तो युवक आज आंतरराष्‍ट्रीय कलाकार म्‍हणून गणला जातो.' 
 
'नसीरुद्दीनवर जबाबदाऱ्यांंचे ओझे नाही, माझे तसे नाही' 
- बॉलीवुडमधील संघर्षाच्‍या काळाबद्दल एकदा ओमपुरी म्‍हणाले होते, ' नसीरुद्दीन एक चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते, माझी तसे काही करण्‍याची इच्‍छा नव्‍हती.' 
- मी माझ्या आयुष्‍याबाबत आनंदी आहे. माझ्या कुटुंबात फक्‍त तीनजण आहेत, मी, माझी पत्‍नी आणि मुलगा. त्‍यामुळे आम्‍हाला खर्चासाठी जास्‍त पैसे लागत नाहीत. 
- फक्‍त एका गोष्‍टीची चिंता आहे. माझा मुलगा अजुन लहान आहे. त्‍याच्‍याकडे लक्ष देण्‍याची गरज आहे. मला आजही भरपूर काम करावे लागते. नसीरचे मुल मोठी झाली आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावरील जबाबदाऱ्या संपल्‍या आहेत. माझे तसे नाही. मलातर शेंगा खरेदी करण्‍यासाठीही मेहनत घ्‍यावी लागते. 
- चित्रपटासाठी मिळणाऱ्या मानधनाबद्दल खंत व्‍यक्‍त करताना ओम पुरी एकदा म्‍हणाले होते, 'राजकुमार संतोषी यांच्‍या 'चायना गेट' चित्रपटामध्‍ये मी मुख्‍य भूमिकेत असूनही मला फक्‍त 7 लाख रुपये मिळाले होते. जर हिच भूमिका नसीरुद्दीन यांनी केली असती तर त्‍यांना माझ्यापेक्षा पाचपट जास्‍त पैसे मिळाले असते.'  
 
कित्‍येकजण मला अमरीश पुरींचा भाऊ समजायचे 
- ओम पुरी 'बाबुल' चित्रपटाचा किस्‍सा सांगताना म्‍हणाले होते, 'रवि चोप्रा यांच्‍या 'बाबुल' चित्रपटात अमिताभ यांच्‍या मोठया भावाची भुमिका अमरीश पुरी करणार होते. मात्र त्‍यांचे निधन झाल्‍याने ही भूमिका करण्‍याची संधी मला मिळाली. 
- चित्रपट प्रदर्शित झाल्‍यानंतर कित्‍येक लोकांना वाटले की, मी अमरीश पुरींचा भाऊच आहे. तसे बरेच फोन मला त्‍यानंतर आले.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
 
 
 
 
 
 
 

   
 
 
 
 
 
 
 
 
 

  
 
 
 
 
 
    
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

     
बातम्या आणखी आहेत...