(उजवीकडे- अभिनेत्री सोनम कपूर, डावीकडे - दिवंगत नीरजा भनोत)
अभिनेत्री सोनम कपूरचा हा लूक ‘नीरजा’ सिनेमामध्ये दिसणार आहे. आगामी ‘नीरजा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये यासाठी बोइंग 747 चा फंक्शनल सेट उभारण्यात आला आहे. कांदिवलीमध्ये उभारण्यात आलेल्या या सेटवर चित्रपटाचे बहुतांश शूटिंग होणार आहे. सोनमने या चित्रपटाबाबत बोलताना सांगितले, ‘या चित्रपटासाठी मी वर्कशॉपबरोबरच अनेक गोष्टीची तयारी केली असून आता चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.’
सत्य घटनेवर आधारित असलेला हा बायोपिक अपहरण झालेल्या विमानातील सेविका नीरजा भनोतच्या धाडस आणि या घटनेत तिला आलेल्या मृत्यूवर आधारित आहे. सोनमचा ‘नीरजा’च्या माध्यमातून पुढील वर्षाच्या पुरस्कारावर डोळा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सोनमचा 'नीरजा'साठीचा न्यू लूक...