आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधा स्वामी सत्संग ब्यास सेंटरमध्ये झाली होती शाहिद-मीराची पहिली भेट, 90 देशांत आहेत सेंटर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमृतसरजवळील राधा स्वामी सत्संग ब्यास सेंटर, इनसेटमध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुढील महिन्यात विवाहबद्ध होणारेय. दिल्लीची तरुणी मीरा राजपूतसोबत अमृतसर जवळील राधा स्वामी सत्संग ब्यासमध्ये त्याचे लग्न होणारेय. शाहिद आणि मीराचे कुटुंबीय ब्यास स्थित राधा स्वामी सत्संगचे अनुयायी आहेत. त्यामुळे येथेच शाहिद-मीराचे लग्न व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे. दोघांनीही आपल्या कुटुंबीयांच्या इच्छेचा मान ठेवत ग्रीकमध्ये होणारा लग्नसोहळा रद्द करुन अमृतसरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. बाबा गुरिंदर सिंह त्यांच्या लग्नात सहभागी होणार असल्याचे कळते.
येथेच झाली होती मीरा-शाहिदची भेट
बातम्यांनुसार, शाहिद आणि मीरा राजपूतची पहिली भेट राधा स्वामी सत्संग ब्यासमध्ये झाली होती.
काय आहे राधा स्वामी सत्संग ब्यास (RSSB):
राधा स्वामीचा अर्थ आत्म्याचा देव असा होता. सत्संगचा अर्थ सत्यासोबत परिचय करणे आहे. ब्यासचा अर्थ कस्बा होतो, जो नॉर्थ इंडियातील अमृतसर (पंजाब)जवळ स्थित आहे. RSSB ची स्थापना 1891 मध्ये झाली होती. लोकांना धार्मिक संदेश देणे हा त्यामागील उद्देश होता. बाबा गुरिंदर सिंह 1990 पासून येथे उपदेश देत आहेत.
जगभरात 90 देशांत सक्रिय आहे RSSB
RSSB जगातील 90 देशांत सक्रिय आहे. यूएसए, स्पेन, न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया, जापाना, आफ्रिकासह अनेक देशांत याच्या शाखा आहेत. RSSBचा कुठल्याही राजकिय किंवा कमर्शिअल संस्थांशी संबंध नाहीये.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जगभरातील वेगवेगळ्या देशांत असलेल्या राधा स्वामी सत्संग ब्यास सेंटर्सची झलक...