आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पीपली लाइव्ह\'चे अभिनेते सीताराम पांचाल यांचे निधन, कॅन्सरमुळे झाली होती अशी अवस्था

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बँडिट क्वीन'(1995), 'स्लमडॉग मिलिनेयर'(2009), 'पीपली लाइव'(2010), 'पान सिंह तोमर'(2012) आणि 'जॉली एलएलबी 2' (2017) या सिनेमात झळकलेले अभिनेते सीताराम पांचाल यांचे निधन झाले आहे. ते मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित होते.
 
उपचारांसाठी केली होती मदतीची याचना...
काही दिवसांपूर्वीच कर्करोगाच्या उपचारासाठी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी लोकांना मदतीसाठी आवाहन केले होते. आर्थिक स्थितीही चांगली नसल्याने उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नाही. त्यामुळेच फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी मदत मागितली होती.
 
या सिनेमांमध्ये केले होते काम..
- सीताराम यांनी बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 
- ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’ या सिनेमात त्यांनी लाला लाजपत राय यांची भूमिका साकारली होती. 
- याशिवाय ‘पीपली लाईव्ह’मध्ये भाई ठाकूरची भूमिका साकारलेली. ‘लज्जा’ आणि ‘हल्ला बोल’ या सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारली.

पुढे बघा, सीताराम पांचाल यांचे शेवटच्या काळातील आणि चित्रपटातील लूकचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...