आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर आजाराशी लढतोय अक्षयसोबत झळकलेला हा अभिनेता, सोशल मीडियावर मागितली मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबईः 'बँडिट क्वीन'(1995), 'स्लमडॉग मिलिनेयर'(2009), 'पीपली लाइव'(2010), 'पान सिंह तोमर'(2012) आणि 'जॉली एलएलबी 2' (2017) या सिनेमात झळकलेले अभिनेते सीताराम पांचाल मृत्यूशी लढा देत आहेत. ते मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमधून त्यांनी लोकांना मदतीसाठी आवाहन केले.  आर्थिक स्थितीही चांगली नसल्याने उपचारासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध नाही. त्यामुळेच फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी मदत मागितली.

काय लिहिले पोस्टमध्ये...  
- ‘मित्रहो माझी मदत करा, कर्करोगाने माझी तब्येत खालावतेय,’ अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर टाकली आहे. या पोस्टनंतर त्यांना लोकांनी मदतही करायला सुरुवात केली आहे.
- 2014 साली पांचाल यांना कर्करोग झाल्याचे कळले. त्यानंतर आजारी असतानाही त्यांनी ‘जॉली एलएलबी 2’मध्ये अक्षय कुमारसोबत भूमिका साकारली. 
- मागील 10 महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळलेले आहेत.
 
‘सीने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन’धावून आले मदतीला... 
‘सीने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन’सुद्धा सीताराम यांच्या मदतीला धावून आलेय. असोसिएशनने आपल्या फेसबुक पेजवरून त्यांना मदत करण्यासाठी आवाहन केले आहे. ‘सीने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन’च्या सोशल मीडिया अकाउंटवर सीताराम पांचाल यांच्या अकाउंटविषयीची माहिती देण्यात आली आहे.  #HELP #SITARAMPANCHAL It pains us to hear the suffering of our esteemed member Shri Sitaram Panchal, we assure him of all the help we can provide to him in his hour of need and also urge all of you to open your hearts.
Name :- Sitaram Panchal 
Hdfc Bank Account No : 10771000013197
RTGS/NEFT IFSC: HDFC0001077 Mira Road branch, Mumbai, India  
 
कलाकार सरसावले मदतीसाठी... 
- सिनेसृष्टीतून संजय मिश्रा, सुशांत सिंह, मुकेश तिवारी, मनोज जोशी आणि निर्माते राकेश पासवान हे सीताराम यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. निर्मात्या अश्विनी चौधरी यांनीसुद्धा ट्विट करुन लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. 
- सीताराम यांना सामान्य लोकसुद्धा मदत करत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकांनी त्यांना 50-100 पासून ते 10 हजारांपर्यंतची मदत केली आहे. 
- सीताराम यांनी बॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 
- ‘द लेजंड ऑफ भगत सिंग’ या सिनेमात त्यांनी लाला लाजपत राय यांची भूमिका साकारली होती. 
- याशिवाय ‘पीपली लाईव्ह’मध्ये भाई ठाकूरची भूमिका साकारलेली. ‘लज्जा’ आणि ‘हल्ला बोल’ या सिनेमांमध्ये  त्यांनी भूमिका साकारली.
 
पुढे बघा, सीताराम पांचाल यांचे 4 फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...