आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 जानेवारी 2018 रोजी रिलीज होऊ शकतो \'पद्मावती\', आता गुजरातमध्येही प्रदर्शनावर BAN

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटाला दिवसेंदिवस वाढत चालेला विरोध बघता निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे. 1 डिसेंबर 2017 रोजी ही चित्रपट प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’ला राजपूत संघटनांचा विरोध होत आहे. करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि संजय लीला भन्साळी यांना उघडपणे धमकीही दिली. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक बदलांची कारणे देत चित्रपट निर्मात्यांकडे परत पाठवला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. आता मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढची तारीख समोर आली आहे. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1 डिसेंबर रोजी चित्रपटाचे प्रदर्शन रद्द झाल्याने करणी सेनेने 1 डिसेंबर रोजी भारत बंदचा निर्णय रद्द केला आहे. 

 

गुजरातमध्येही प्रदर्शनावर बॅन.. 

राजस्थान, मध्यप्रदेश आणि पंजाबच्या पाठोपाठ आता गुजरातमध्येही पद्मावती चित्रपटावर BAN लावला जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी बुधवारी म्हणाले की, गुजरात सरकार राजपुतांच्तोंया भावना दुखावणाऱ्या 'पद्मावती' चित्कोरपटाला राज्यात प्रदर्शित करण्याची परवानगी देऊ शकत नाही. आम्अही इतिहासाशी छेडछाड सहन करणार नाही. अभिव्औयक्रती स्वातंत्र्यावर आमचा विश्वास आहे. पण संस्कृतीचा अपमान सहन केला जाणार नाही. 


या कारणामुळे 12 जानेवारी रोजी प्रदर्शन होऊ शकतो चित्रपट... 
5 जानेवारी रोजी दीपिका पदुकोणचा वाढदिवस आहे. त्यामुळे या दिवशी हा चित्रपट खरं तर प्रदर्शित होऊ शकतो. पण नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात बॉलिवूडमध्ये चित्रपट रिलीज न करण्याचा गेल्या काही वर्षांचा ट्रेंड आहे. त्यामुळे नवीन वर्षी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्याऐवजी दुस-या आठवड्यात म्हणजे 12 जानेवारी रोजी 'पद्मावती' प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे. 12 जानेवारी रोजी 'पद्मावती' प्रदर्शित झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 26 जानेवारी रोजी अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' आणि सिद्धार्थ मल्होत्रा-मनोज बाजपेयी स्टारर 'अय्यारी' प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

 

पुढे वाचा, कसा सुरु झाला पद्मावती चित्रपटावरुन वाद आणि वादावर कोण काय म्हणाले...

बातम्या आणखी आहेत...