आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सॉरच्या मंजुरीशिवाय परदेशात ‘पद््मावती’चे प्रदर्शन नाहीच : निर्माता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लंडन- वादग्रस्त पद्मावती चित्रपटास ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने विना कट मंजुरी दिली आहे. बीबीएफसीने चित्रपटास १२-ए रेटिंग दिले असून १२ वर्षांच्या आतील मुले हा चित्रपट पाहू शकणार नाहीत. दरम्यान, चित्रपट निर्माती कंपनी वायकॉम-१८ने भारतात सेन्सॉरची परवानगी मिळाल्याशिवाय परदेशात चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असे म्हटले आहे. नियोजित वेळेनुसार १ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला परवानगी मिळावी म्हणून सध्या ५० देशांत मंजुरी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू असली तरी वादामुळे भारतात प्रदर्शन लांबले अाहे.

 

इंडियातील रिलीजवर सस्पेन्स 
- भारतामध्ये 'पद्मावती' चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज होणार होता. मात्र राजपूत समाजाने त्याला केलेला विरोध पाहाता याची रिलीज डेट टाळण्यात आली आहे. आता असे म्हटले जात आहे की 12 जानेवारी 2018 ला चित्रपट प्रदर्शित होईल. 

 

गुजरातमध्येही बंदीची घोषणा 
- राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये 'पद्मावती'वर आधीच बंदी घालण्यात आली आहे. आता गुजरात सरकारनेही राज्यात पद्मावती प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 
- मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, 'चित्रपटामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा अनेक लोकांना मी भेटलो आहे. त्यांच्या भावनांचा आम्ही सन्मान करतो.'

 

पद्मावतीला का आहे विरोध? 
- राजस्थानची करणी सेना, भारतीय जनता पक्षाचे नेते, हिंदुत्ववादी संघटना यांचा आरोप आहे की पद्मावती चित्रपटात इतिहासासोबत छेडछाड करण्यात आली आहे. 
- राजपूत करणी सेनेचा आरोप आहे, की चित्रपटामध्ये राणी पद्मिनी आणि अलाऊद्दीन खिलजी यांच्या प्रेमप्रसंग दाखवण्यात आला आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत.
- त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनापूर्वी तो आम्हाला दाखवला पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...