आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'पाकिजा\'च्या या अभिनेत्रीला रुग्णालयात सोडून मुलाचा पोबारा, मुलाच्या प्रतिक्षेत झाली व्याकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : 1972 साली आलेल्या 'पाकिजा' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री गीता कपूर तुम्हाला आठवतेय का.. आज कदाचित हे नाव तुमच्या विस्मृतीत गेलं असेल. मात्र एकेकाळी हे हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव होतं. ‘पाकिजा’सह शंभरहून अधिक सिनेमांमध्ये झळकलेल्या या अभिनेत्रीच्या नशीबी आज एकटे जगणे आले आहे. त्याचे कारण म्हणजे गीता कपूर यांना हॉस्पिटलमध्ये एकटे सोडून त्यांच्या मुलाने तेथून पळ काढला आहे. 21 एप्रिल रोजी तब्येत बिघडल्याने गीता कपूर यांचा मुलगा राजा कपूरने एका खासगी हॉस्टिलमधून अॅम्ब्युलन्स मागवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करुन तो पसार झाला. 21 एप्रिलला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर राजा कपूर त्यांना भेटायला आला नाही, शिवाय फोनलाही उत्तर दिलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे ज्या घरात तो राहत होता, ते घरही राजा कपूर सोडून गेला आहे.
 
रमेश तौरानी आणि अशोक पंडीत धावून आले मदतीला... 
- निर्माते रमेश तौरानी आणि अभिनेते अशोक पंडील यांना या घटनेची माहिती मिळतात, त्यांनी रुग्णालयात जाऊन गीता कपूर यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि रुग्णालयाचे दीड लाख रुपये बिल भरले. 

काय म्हणाले रुग्णालय प्रशासन...  
- आता गीता कपूर यांची तब्येत सुधारली आहे. हॉस्पिटल त्यांना डिस्चार्ज द्यायलाही तयार आहे. पण मुलानेच पळ काढल्याने आता गीता यांना एखाद्या वृद्धाश्रमात दाखल करण्याचा डॉक्टरांचा विचार आहे.
- रुग्णालयातील एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी राजा कपूरने फोन करुन अॅम्ब्लून्स मागवली. जेव्हा गीता कपूर यांना रुग्णालयात आणण्यात आले, तेव्हा राजाला पैसे डिपॉझिट करण्यास सांगितले गेले. एटीएममधून पैसे काढून आणण्याचा बहाणा करत राजा रुग्णालयाबाहेर पडला, त्यानंतर तो परतलाच नाही. 
- आश्चर्याची बाब म्हणजे, जेव्हा रुग्णालय प्रशासनाने राजाच्या घरी जाऊन चौकशी केली, तेव्हा त्याने तीन महिन्यांपूर्वीच ते घर भाड्याने घेतल्याचे त्यांना समजले. आई गीता कपूरला रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच त्याने ते घरसुद्धा सोडले. 
- रुग्णालय प्रशासनाने आता पोलिसांची मदत घेतली आहे. गीता यांना एक मुलगी असून ती एअरहोस्टेट असल्याचे समजते आहे. रुग्णालयाने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. 

शंभरहून अधिक सिनेमांत केला अभिनय.. 
पाकिजा, रजिया सुलताना, प्यार करके देखो यासह 100 हून अधिक हिंदी सिनेमांत गीता कपूर यांनी काम केलं आहे. मुलाने थकवलेल्या हॉस्पिटलच्या बिलामुळे अभिनेत्री गीता कपूर चर्चेत आल्या आहेत. मुलाच्या प्रतिक्षेत गीता कपूर रडून रडून व्याकूळ झाल्या आहेत. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, संबंधित छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...