आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय सिनेमांवरची बंदी पाकिस्तानने उठवली, आता रिलीज होणार बॉलिवूड सिनेमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उरी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये जो तणाव सुरु होता त्यामुळे पाकिस्तानने, भारतीय सिनेमे दाखवण्यावर बंदी घातली होती. पण आता ही बंदी उठवण्यात आली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतीय सिनेमे दाखवण्यावरची बंदी उठवली असून प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. या महिन्यात पाकिस्तानात बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सुरुवात ही काबिल आणि रईस या सिनेमांनी होणारेय.  
 
आता एका महिन्यात या ना हरकत प्रमाणपत्राद्वारे दोन ते तीन भारतीय सिनेमे पाकिस्तानातल्या सिनेमागृहात दाखवण्यासाठी आयात करण्याची तयारी माहिती-प्रसारण मंत्रालयाने सुरू केली आहे. 

उरी हल्ल्यानंतर बॉलिवुडमध्ये पाकिस्तान कलाकारांना न घेण्याचा निर्णय भारतात झाल्यावर ‘जशास तसे’ उत्तर देण्याच्या नादात पाकिस्ताननेही 4 महिन्यांपूर्वी हिंदी सिनेमांवर बंदी घातली. पण यामुळे तेथील सिनेमागृहांना आर्थिक फटका बसू लागल्याने ही बंदी उठवण्याच्या हालचाली पाकिस्तान सरकारने सुरू केल्या आहेत. इस्लामाबाद सरकारने बॉलिवूड सिनेमांच्या प्रदर्शानाच्या परवानगीची मागणी केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यासंबंधी थिएटर मालकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी एका समितीची घोषणा केली होती.
 
भारतीय सिनेमांवर बंदी घातल्यामुळे पाकिस्तानी चित्रपट मालकांचे सुमारे 15 कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय सुमारे 100 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही गेल्या.  
बातम्या आणखी आहेत...