आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistan Minister Says Hrithik Roshan’S Mohenjo Daro Is A Mockery, Demands Apology

पाकच्या मंत्र्यांनी उपस्थित केले 'मोहेंजोदारो'वर प्रश्न, म्हणाले गोवारिकरांनी मागावी माफी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री सरदार अली शाह यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांनी माफी मागावी, असे म्हटेल आहे. गेल्याच महिन्यात आशुतोष गोवारिकरांचा 'मोहेंजोदारो' हा सिनेमा रिलीज झाला होता.

या सिनेमाच्या कथेमुळे सरदार अली शाह नाराज आहेत. शाह यांच्या मते, गोवारिकरांनी पाच हजार जुने ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पद्धतीने सादर केले आहेत.

सिनेमा पुर्णतः काल्पनिक आहे. याचा मोहेंजोदारो संस्कृतीशी काहीही साम्य नाही. जगाला सिंध संस्कृतीची माहिती आहे.

मोहेंजोदारो इंटरनॅशनल हेरिटेज साइट्समध्ये सामील असून युनेस्को सरकारसोबत मिळून याची देखभाल करत आहे.

१२ ऑगस्ट रोजी रिलीज झालेला मोहेंजोदारो हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...