आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या पाकिस्तानी अॅक्ट्रेसने कपिल शर्मासोबत KISS देण्यास दिला नकार!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सादिया खान)
मुंबईः पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान हिने अभिनेता कपिल शर्मासोबत किसींग सीन देण्यास नकार दिला आहे. हा कपिल शर्मा म्हणजे 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' फेम कपिल नव्हे, तर दिग्दर्शक संजय शर्मांच्या आगामी सिनेमातील नवोदित अभिनेता आहे. संजय शर्मा यांच्या आगमी 'Dunno Y2…Life Is A Moment' या सिनेमात एका किसींग सीनची गरज होती. मात्र सिनेमाची हिरोईन सादिया खानने हा किसींग सीन करण्यास नकार दिला.
सादिया म्हणते, की भारतात अभिनेत्रींनी किसींग सीन देणे एक साधी गोष्ट आहे. मात्र पाकिस्तानसारख्या इस्लामिक देशात अशा प्रकारच्या सीन्सवर बंदी आहे. हिंदी सिनेमात किसींग सीन दिल्यास पाकिस्तानात तिला टीकेला सामोरे जावे लागले. इतकेच नाही तर हा किसींग सीन इंटरनेटवर व्हायरला झाल्यास त्याला तेथून काढणे अशक्य होईल, अशी भीती तिने व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक संजय शर्मा यांनी मात्र सादियाच्या अशा वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, सादियाचे वागणे अनप्रोफेशनल आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, सादियाने पाकिस्तानामुळे नव्हे तर बॉयफ्रेंडच्या भीतीने किसींग सीन देण्यास नकार दिला आहे. सादियाच्या बॉयफ्रेंडने तिला सिनेमात किसींग सीन न देण्यास बजावल्याचे सूत्रांकडून समजते.
'Dunno Y... न जाने क्यों' या सिनेमाचा हा सिक्वेल
'Dunno Y2 Life Is A Moment' हा सिनेमा 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'Dunno Y... न जाने क्यों' या सिनेमाचा सिक्वेल आहे. सिनेमात सादिया खान आणि कपिल शर्मा यांच्यासह युवराज पाराशर, झीनत अमान आणि मीरा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या वर्षी हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे.
टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे सादिया खान
सादिया खान पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 'यारियां' आणि 'खुदा और मोहब्बत' या पाकिस्तानी मालिकांसाठी तिला ओळखले जाते. 'देवर-भाभी' या पाकिस्तानी सिनेमातही ती झळकली आहे. हा सिनेमा 2013 मध्ये रिलीज झाला होता. 1967 मध्ये रिलीज झालेल्या आणि हेच शीर्षक असलेल्या सिनेमाचा हा रिमेक होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सादिया खानची निवडक छायाचित्रे...