आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड टूर, स्टेज शोवर पाणी; पाक कलावंतांची कमाई ७५% नी घटेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी कलावंतांवर बाॅलीवूडमध्ये बंदी घातली जात आहे. त्यामुळे कोणाचे नुकसान होईल, हा मोठा प्रश्न आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे बॉलीवूडवर तर परिणाम होणार नाही, पण पाक कलावंतांची कमाई आणि प्रतिष्ठा यावर मोठा परिणाम होईल. फवाद खान, अली जफर यांसारख्या पाकिस्तानी कलावंतांना पाकमध्ये एका चित्रपटासाठी फक्त २५ लाख रुपये मिळतात. आपल्या हिंदी चित्रपटांसाठी मात्र त्यांना एक ते दीड कोटी रु. मिळतात. म्हणजे त्यांच्या कमाईत सुमारे ७५ टक्के नुकसान होईल. फक्त मानधनच नव्हे तर येथे बंदी घातल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्टेज शो आणि टूरही मिळणार नाहीत. लंडन, अमेरिका, दुबई येथे हिंदी चित्रपटांमुळे त्यांना स्टेज शो आणि इतर चित्रपट टूरमध्ये सहभागाची संधी मिळते. ‘कपूर अँड सन्स’ या चित्रपटाच्या १८ दिवसांच्या शूटिंगसाठी फवादला एक कोटी रुपये मिळाले होते. फवादने पाकिस्तानमध्ये चित्रपटांपेक्षा टीव्हीत जास्त काम केले. तेथे त्याला प्रत्येक भागासाठी फक्त ४ लाख मिळतात. पाकिस्तानी कलावंताना मिळणारे हे सर्वाधिक शुल्क आहे.आपल्याकडे टीव्हीच्या मोठ्या कलावंतांना २० ते २५ लाख मानधन मिळते. चित्रपट व्यापार विश्लेषक अमोद मेहरांनी सांगितले की, आपल्या चित्रपटांत पाकिस्तानी कलावंतांना तिप्पट जास्त मानधन मिळते. कधी तर दहापट जास्त मिळते म्हणजेच पैसा आणि प्रसिद्धी या दोन्हींत नुकसान होईल.

कोणत्याही पाकिस्तानी कलावंताच्या हिंदी चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा नवा विक्रम केला नाही. हे कलावंत नसले तरी बॉलीवूडवर काही परिणाम होणार नाही. फवादबाबत बोलायचे तर ‘खूबसूरत’ या त्याच्या पहिल्या चित्रपटाने जेमतेम कमाई केली होती. ‘कपूर अँड सन्स’ या दुसऱ्या चित्रपटात ऋषी कपूर, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांसारखे प्रस्थापित कलावंत होते. अली जफरने एकूण ७ चित्रपट केले, त्यातील तीन हिट होते. या तिन्हींत प्रस्थापित कलावंत होते. तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानी चित्रपटांचे बजेट आणि कलावंतांचे मानधन मराठी
उर्वरित महिला विश्व चित्रपटसृष्टीएवढे आहे.
पाकिस्तानमध्ये मोठ्या चित्रपटाचे बजेट एक ते दीड कोटींपेक्षा जास्त नसते. त्यांचा व्यवसायही ८ ते ९ कोटींपेक्षा जास्त होत नाही. कलावंतांना २५ लाखपेक्षा जास्त मानधन मिळत नाही. या हिशेबाने त्यांची कमाई सुमारे ७५ टक्क्यांनी कमी होईल. फक्त अदनान सामीचा अपवाद. त्याने भारताचे नागरिकत्ल स्वीकारले आणि तुलनात्मकदृष्ट्या तो खूप श्रीमंत कलावंतांच्या श्रेणीत आहे. मुंबईच्या पॉश भागात त्याची मालमत्ता आहे.

राहत फतेह अली खानला बॉलीवूडच्या एका गीतासाठी १५ लाख रुपये मिळतात. हा आकडा इतर बड्या भारतीय गायकांच्या आकड्याएवढा आहे. पाकिस्तानमध्ये राहतला एका गीतासाठी फक्त एक ते तीन लाख मिळतात. आतिफ असलम, शफाकत अमानत अली यांसारख्या गायकांचीही हीच स्थिती आहे. भारतात या गायकांचे स्टेज शो होतात. हिंदी चित्रपटांच्या सुपरहिट गाण्यांमुळे त्यांना विदेशी स्टेजही मिळते. भारतातील बंदीमुळे पाकिस्तानी गायकांचेही मोठे नुकसान होईल. चित्रपट प्रदर्शक आणि वितरक अक्षय राठींनी सांगितले की, येथे येऊन पाकिस्तानी कलावंत कोट्यवधी रुपये कमावतात. चित्रपटांवर बंदीबाबत बोलायचे तर नुकसान निर्मात्यांचेच होणार आहे. फवाद खानने तर त्याचे मानधन घेतलेच आहे, त्याचे काय नुकसान? सेन्सॉरने ज्या चित्रपटाला मंजुरी दिली त्यावर कोणीही बंदी घालू नये. बंदी घालायची असेल तर कायदेशीर मार्गाने स्थगिती मिळवावी. कितीही विरोध झाला तरी मी चित्रपट प्रदर्शित करणारच कारण त्यात रणधीर कपूर आहे. त्याच्या कुटुंबाने चार पिढ्यांपासून भारताचा सन्मान वाढवला आहे. ऐश्वर्या रॉय बच्चन आणि करण जोहर यांच्यासारखे प्रसिद्ध लोकही त्यात सहभागी आहेत. निर्माता टी. पी. अग्रवाल म्हणाले की, आम्ही आपल्या चित्रपटातून राहतचे गाणे काढले. आमच्या चित्रपटामुळे थोडे नुकसान होईल, गाणी पुन्हा रेकॉर्ड करावी लागतील, पण देशापुढे हे नुकसान काहीच नाही. दहशतवादावर पाकिस्तानी कलावंतांचे मौन आम्हाला मान्य नाही. चित्रपट निर्मात्यांची संघटना इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनने (इम्पा) पाकिस्तानी कलावंतांना हिंदी चित्रपट उद्योगात काम करण्यावर बंदी घातली आहे.
सर्वात मोठे नुकसान फवादचे
{बंदीचा सर्वात जास्त परिणाम फवाद खानवर होईल. त्याचे कारण म्हणजे सध्याच्या पाकिस्तानी कलावंतांत तोच सर्वाधिक प्रसिद्ध आहे. तज्ज्ञांच्या मते एक ते दीड कोटी फी घेणाऱ्या फवादला बॉलीवूडच्या बळावर विदेशात स्टेज शो आणि टूर मिळतात. फवाद या टूरसाठी २० लाख रुपये घेतो. एका टूरमध्ये ५-६ कार्यक्रम होतात. त्यामुळे एका टूरमधून त्याला एक कोटी रु. मिळतात.
तो तीन ब्रँडची जाहिरातही करतो. फवाद भारतात एका ब्रँडकडून ४ ते ५ कोटी रुपये घेतो.
बातम्या आणखी आहेत...