आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pakistani Film Bin Roye To Not Release In Maharashtra After Raj Thackeray’s Warning

मनसेच्या धमकीमुळे महाराष्ट्रात रिलीज होऊ शकला नाही पाकिस्तानी \'बिन रोए\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पाकिस्तानी सिनेमा 'बिन रोए' महाराष्ट्र सोडून देशातील इतर राज्यात शुक्रवारी रिलीज झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या धमकीमुळे डिस्ट्रिब्यूशन कंपनीने महाराष्ट्रात सिनेमा रिलीज केला नसल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्‍ट्रात 'बिन रोए' सिनेमा प्रदर्शित करू नका, अशी धमकी महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने डिस्ट्रीब्यूटर 'बी4यू ब्रॉडबॅड इंडिया'ला दिली होती. त्याचबरोबर महाराष्ट्रात सिनेमासंदर्भात कुठेही पत्रकार परिषद घेवू नका. सिनेमा प्रदर्शित झाला तर डिस्ट्रिब्यूटरविरुद्ध कारवाई केली जाईल, असे मनसेने फोन करून धमकावल्याचे सूत्रांनी सांगितले.

मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या या सिनेमात माहिरा खान आणि हुमायू सईद या दोघांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
मनसे चित्रपट सेनेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानात भारतीय सिनेमाचे स्वागत केले जात नाही. त्यामुळे पाकिस्तानी सिनेमा 'बिन रोए'च्या प्रदर्शनाला महाराष्ट्रात विरोध करण्यात आल्याचे मनसेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले की, पाकिस्तानात भारतीय सिनेमावर बंदी घातली जाते. आमच्या कलाकलांसोबत गैरवर्तवणूक केली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात पाकिस्तानचा एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नसल्याचे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. पाकिस्तान हे पायरेसीचे मोठे हब आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'हमसफर'मुळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री महिरा खान 'बिन रोए'मध्ये मुख्य भूमिकेत....
बातम्या आणखी आहेत...