बॉलिवूडचा सुपरस्टार
सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सलमानसोबत या सिनेमातील आणखी एक अभिनेता भाव खाऊन जातो, तो म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजुद्दीनने या सिनेमात पाकिस्तानच्या स्थानिक रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. सिनेमातील त्याची ही व्यक्तिरेखा याच नावाच्या पाकिस्तानी पत्रकारावर आधारित असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे.
चार वर्षांपूर्वी यू ट्यूबवर पाकिस्तानी रिपोर्टर चाँद नवाब यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये चाँद नवाब एक बातमी देत आहेत. मात्र त्यावेळी कॅमेरा आणि त्यांच्यामधून लोकांची ये-जा होत असल्यामुळे चाँद नवाब पुरते वैतागतात. हाच विनोदी व्हिडीओ यू ट्यूबवर हिट झाला होता. हेच दृश्य अगदी हुबेहुब सिनेमात चित्रीत करण्यात आले आहे.
आता याच ख-याखु-या चाँद नावब यांच्याविषयीची एक लेटेस्ट न्यूज आम्ही तुम्हाला देतोय. पाकिस्तानी पत्रकार चाँद नवाब यांनी सलमान खानकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. 'बजरंगी भाईजान'मध्ये खऱ्या चांद नवाबप्रमाणेच नवाजुद्दीनने अभिनय केला आहे.
चाँद नवाब यांनी गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, "मी एक गरीब पत्रकार आहे. मला कोणत्याही कायदेशीर बाबींचा अवलंब करायचा नाही. मात्र माझ्या पात्रावरुन प्रेरणा घेतल्यामुळे सलमान खान यांनी मला आर्थिक मदत करावी, एवढीच माझी अपेक्षा आहे." पुढे ते म्हणाले, "माझा उद्देश हा पैसे मिळवणे नसून ही केवळ माझी त्यांना विनंती आहे."
आता सलमान चाँद नवाब यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना आर्थिक मदत करतो, का हे येणा-या दिवसांत स्पष्ट होईल.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, चाँद नवाब यांचा रेल्वे स्टेशनवर पीटूसी देतानाचा गाजलेला व्हिडिओ...