आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्कासारखी दिसायची ही गायिका, मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी झाला होता घटस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाजिया हसन आणि अनुष्का शर्मा - Divya Marathi
नाजिया हसन आणि अनुष्का शर्मा
मुंबई: 1980 मध्ये रिलीज झालेल्या 'कुर्बानी' या सिनेमातील ''आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए..'' हे गाणे नक्कीच तुमच्या लक्षात असेल. हे गाणे पाकिस्तानी सिंगर नाजिया हसन यांनी गायले होते. हुबेहुब अनुष्का शर्मा सारख्या दिसणा-या या गायिकेने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी हे गाणे गायले होते. या सुपरहिट साँगसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. व्यवसायाने गायिका, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या राहिलेल्या नाजिया यांचे खासगी आयुष्य मात्र अनेक खाचखळग्यांनी भरले होते. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांना कॅन्सरचे निदान झाले आणि त्यानंतर पाच वर्षांनी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 
 
मृत्यूच्या दहा दिवसांपूर्वी झाला होता घटस्फोट... 
वयाच्या 30 व्या वर्षी म्हणजे 30 मार्च 1995 रोजी नाजिया यांनी बिजनेसमन मिर्जा इश्तियाक बैगसोबत कराची येथे निकाह केला होता. लग्नापूर्वीच त्यांना कॅन्सर पीडित होत्या. लग्नाच्या दोन वर्षांनी 1997 मध्ये त्यांनी मुलगा अर्ज हसनला जन्म दिला. आजारपणामुळे 13 ऑगस्ट 2000 रोजी लंडनमध्ये त्यांचे निधन झाले होते. निधनाच्या दहा दिवसांपूर्वी त्यांनी नव-यापासून घटस्फोट घेतला होता.  

वयाच्या 15 व्या वर्षी मिळाला होता फिल्मफेअर
बॉलिवूड डायरेक्टर फिरोज खान यांनी नाजियाची भेट लंडनमध्ये काम करणा-या भारतीय संगीतकार बिंदू यांच्याशी घालून दिली. त्यांनीच नाजिया यांना कुर्बानी (1980) सिनेमात गाण्याची संधी दिली. ''आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए तो बात बन जाए...'' या गाण्याने नाजियाला यशोशिखरावर नेले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी हे गाणे स्वरबद्ध केले होते. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. एवढ्या कमी वयात फिल्मफेअर अवॉर्ड मिळवणा-या त्या पहिल्या पाकिस्तानी सिंगर ठरल्या. त्यांचा हा रेकॉर्ड आजही कुणी मोडीत काढू शकलेला नाही. 'कुर्बानी' सोबतच नाजिया यांनी त्यांचे भाऊ जोहेबसोबत 1982 मध्ये आलेल्या 'स्टार' या सिनेमासाठी गाणी गायली होती. 

पहिल्या अल्बममुळे एकवटली होती चर्चा...  
नाजिया यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सिंगिंग करिअरला सुरुवात केली होती. त्यांचा पहिला अल्बम 'डिस्को दीवाने' 1981 मध्ये रिलीज झाला होता. हा एशिया एशिया पॉप रेकॉर्डचा बेस्ट-सेलिंग अल्बम ठरला होता. बूम-बूम, यंग तरंग, हॉटलाइन, कॅमरा कॅमरा हे नाजिया यांचे सर्वच अल्बम लोकप्रिय झाले होते. वयाच्या 25 व्या वर्षी सिंगिंग करिअरमुळे त्यांना पैसा, प्रसिद्धी सर्वकाही मिळाले होते. संगीतावर त्यांनी जीवापाड प्रेम केले होते. अनाथ मुले, महिलांच्या हितासाठी त्यांनी बरेच काम केले होते. आपल्या कमाईतील कोट्यवधी रुपये त्यांनी गरीबांच्या कल्याणासाठी खर्च केले होते.  

पुढील स्लाईड्समध्ये बघा, नाजिया हसन यांचे निवडक फोटोज...