आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाली परिणीती, 6 महिन्यांपूर्वी 22 कोटींत खरेदी केला फ्लॅट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(क्वांटम टॉवरचा व्यू, इनसेटमध्ये परिणीती चोप्रा)
मुंबईः 'शुद्ध देसी रोमान्स' आणि 'दावत ए इश्क' यांसारख्या सिनेमांमध्ये झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा नुकतीच आपल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. तिनेम आपल्या ट्विटर अकाउंटवर पॅकिंगची काही छायाचित्रे शेअर करुन ट्विट केले होते,
"Aaaaaaaand I'm packing!!!! Time to go to my new home and make new memories!!! TOOOO EXCITEDDD!!!! Carton boxes making me happyyyy"
परिणीतीने सहा महिन्यांपूर्वी मुंबईत आपला नवीन फ्लॅट खरेदी केला होता. खार परिसरातील क्वांटम टॉवरमध्ये परिणीतीचा फ्लॅट असून तो चार हजार स्वे. फूट इतका मोठा आहे. या फ्लॅटची किंमत 22 कोटी रुपये आहे. चार बेडरुम, हॉल आणि किचन असलेल्या या फ्लॅटचे वैशिष्ट्य म्हणजे तो सी फेसिंग आहे.
याच टॉवरमध्ये प्रीती झिंटा वास्तव्याला...
परिणीतीने ज्या बिल्डिंगमध्ये आपला नवी आशियाना खरेदी केलाय, तेथेच प्रीती झिंटाचेही घर आहे. याशिवाय निर्माता करण जोहरचे ऑफिस येथून खूप जवळ आहे. इतकेच नाही तर सेलिब्रिटींच्या आउटिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऑलिव्ह रेस्तराँसुद्धा येथून काही अंतरावर आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, परिणीतीचे नवीन घर असलेल्या क्वांटम टॉवरचे आतील आणि बाहेरील फोटोज...