आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर दगडफेकीमुळे भडकला जॉन अब्राहम, थांबवले \'परमाणु...\' चे शुटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' च्या शुटिंगसाठी जॉन अब्राहम बुधवारीच जोधपूरला पोहोचला होता. पण शुटिंगदरम्यान सेटवर झालेल्या एका प्रकारामुळे त्याने शुटिंग थांबवले असल्याचे समोर आले आहे. कोणीतरी शुटिंग सुरू असताना दगडफेक केल्याने जॉन अब्राहम भडकला होता. 

काय आहे प्रकरण.. 
- डायरेक्टर अभिषेक शर्मा यांच्या 'परमाणु द स्टोरी ऑफ पोखरण'चे शुटिंग राजस्थानातील पोखरणमध्ये सुरू होते. 
- 23 जूनपर्यंत चालणाऱ्या या शुटिंगसाठी जॉन बुधवारीच जोधपूरला आला आणि नंतर तो पोखरणला पोहोचला होता. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार शुटिंग दोन दिवस आधी पोखरण परिसरात सुरू झाले होते. सुमारे आठवडाभरापासून येथे तयारी सुरू होती. 
- गुरुवारी एका टेलिफोन बूथमध्ये सीन शूट केला जात होता. त्याचवेळी अचानक कोणीतरी दगडफेक केली. रात्री अंधारामुळे हा प्रकार कोणी केला ते लक्षात आले नाही. 
- त्यानंतर शुक्रवारी जॉन आणि फिल्म यूनिटने पोखरणमध्ये शुटिंग न करण्याचा निर्णय घेतला. पोखरणच्या विविध भागांत सुमारे आठवडाभर हे शुटिंग होणार होते. पण आता पोखरण फोर्ट आणि जेसलमेरच्या बाजारात शुटिंग केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 

लीड रोलमध्ये डायना पेंटी आणि बोमन ईराणी
- जॉनशिवाय या चित्रपटात डायना पेंटी आणि बोमन ईराणी लीड रोलमध्ये आहेत. 
- थारच्या वाळवंटी भागात 1998 मध्ये भारताने पोखरणमध्ये पाच अणु चाचण्या केल्या होत्या. त्यावर हा चित्रपट तयार केला जात आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS..
 
बातम्या आणखी आहेत...