आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos: हा आहे सलमान खानचा ऑनस्क्रीन 'मुलगा', 9 वर्षांनंतर दिसतोय असा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः तुम्हाला सलमान-गोविंदा स्टारर 2007 मध्ये आलेल्या फिल्म 'पार्टनर'मधला क्यूट रोहन आठवतोय का? तोच रोहन जो सलमानची गाडी त्याच्या बॅटने फोडतो. होय, आम्ही बोलतोय ते अॅक्टर मास्टर अली हाजीविषयी. अलीकडेच अली हाजी बिग बॉसच्या लोणावळ्याच्या सेटवर पोहोचला आणि त्याचे ऑनस्क्रीन पापा अर्थातच सलमान खानसोबत मिळून 'पार्टनर' फिल्ममधील 9 वर्षे जुना सीन री-क्रिएट केला. 'फना'त बनला होता आमिर-काजोलचा मुलगा...
चाइल्ड आर्टिस्ट मास्टर अली हाजी आमिर-काजोल स्टारर फना या सिनेमात त्यांचा मुलगा रेहानच्या भूमिकेत झळकला आहे. याशिवाय सैफ अली खान-राणी मुखर्जी स्टारर 'तारा रम पम' या सिनेमात त्याने काम केले आहे. आता अली हाजी लॅण्ड माफियावर बनत असलेल्या 'द फील्ड' या सिनेमात लवकरच दिसणारेय. या सिनेमात त्याच्यासोबत राधिका आपटे, प्रेम चोप्रा आणि हॉलिवूड अॅक्टर ब्रेंडन फ्रेजर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'पार्टनर'मध्ये केवळ 8 वर्षांचा होता अली हाजी
फिल्म पार्टनर 2007 मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी अली केवळ 8 वर्षांचा होता. सिनेमात त्याने सिंगल मदर बनलेल्या लारा दत्ता (नैना)च्या मुलाची भूमिका साकारली होती. सिनेमात सलमान (प्रेम) आणि अली हाजी (रोहन) ची केमिस्ट्री लोकांना पसंत पडली होती. आता अली 17 वर्षांचा असून हॅण्डसम दिसतोय.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, अली हाजीचे Latest Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...