आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षांच्या वादावर पडला पडदा, परवीन बाबीची 80 टक्के संपत्ती गरजूंसाठी दिली जाणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबी हिच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या वादावर आता पडदा पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, तिच्या संपत्तीतील 80 टक्के वाटा हा गरजू महिला आणि मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. 2005 मध्ये अभिनेत्री परवीन बाबीचा मॄत्यू झाला होता. त्यानंतर गेल्या 11 वर्षांपासून तिच्या संपत्तीचा वाद सुरू होता.
परवीनच्या काकांनी तिच्या संपत्तीच्या वाट्याकरिता तिच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तिच्या मृत्यूपत्राला मंजुरी दिली. यानुसार तिच्या मामांना तिच्या संपत्तीचा 20 टक्के भाग मिळणार आहे.

परवीनचे हे मृत्यूपत्र तिच्या मामांनी 2005 मध्ये न्यायालयाकडे सुपूर्द केले होते. पण तिच्या वडिलांकडील नातेवाईकांनी हे मृत्यूपत्र बनावट असल्याचा दावा केला होता. अभिनेत्री परवीन बाबीने तिच्या मृत्यूपत्रात लिहिले होते की, तिच्या संपत्तीतील 20 टक्के वाटा तिच्या मामांना मिळावा.

पुढे वाचा, कोट्यवधीची मालकिण होती परवीन बाबी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...