आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही अॅक्ट्रेस म्हणाली, हिंदु आहे म्हणूनच विमानातून खाली उतरवले, फेसबूक Video Viral

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॉडेल अॅक्ट्रेस पायल रोहतागीचा एक फेसबूक लाइव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. पायलने फेसबूक लाइव्ह एयरलाइनला चांगलेच सुनावले. केवळ हिंदु असल्यामुळे आपल्याला फ्लाइटमधून उतरवल्याचा आरोप तिने केला आहे. सोशल मीडिया यूझर्सने हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हले आहे. 

मुंबईहून त्रिवेंदमला चालली होती.. 
- खरं तर पायल रोहतागी तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहबरोबर सुट्या घालवण्यासाठी मुंबईहून त्रिवेंद्रमला जात होती. 
- लाइव्ह व्हिडीओत तिने सांगितले की, तिची फ्लाइट सकाळी 6:50 ची होती. ती आणि संग्राम सिंह 6:20 ला एअरपोर्टला पोहोचले. 
- पण क्रूने त्यांना फ्लाइटमध्ये जाण्यास नकार दिला. पायलने क्रू मेंबर्सचे नाव सांगत आरोप केला की, मला हिंदु असल्यामुळे फ्लाइटमध्ये जाऊ दिले नाही. 
- नदीम आणि अब्दुल अशी तिने क्रू मेंबर्सची नावे सांगितली. पैसे झाडावर उगवत नाहीत, असे म्हणत तिने ट्वीटही केले. 

काय आहेत नियम.. 
- पायलच्या फेसबूक पोस्टनंतर यूझर्सने त्यांना चांगलेच फटकारले आहे. काही यूझर्सने तिला नियमही दाखवले आहेत. 
- नियमानुसार 30 मिनटांपूर्वी येणे म्हणजे लेटच्या श्रेणीत मोडते. साधारणपणे एअरलाइन्स 75 मिनिट आधी बोलावतात. 45 मिनिटे सुरक्षा प्रक्रिया पूर्ण करायलाच लागतात. 
- त्यामुळे अर्धा तास आधी जाऊन काय फायदा असे यूझर्सने म्हटले. 
- दुसऱ्या एका यूझरने लिहिले एका फ्लाइटने नाही गेली तर दुसऱ्या फ्लाइटने गेली असती. 

क्रू मेंबरने ट्वीट करत दिले उत्तर 
- पायलने सांगितलेल्या क्रू मेंबर अब्दुलने ट्वीट करत पायल खोटं बोलत असल्याचे उत्तर दिले. 
- अब्दुलने सांगितले की, पायल बिझनेस नव्हे तर इकॉनमी क्लासमध्ये प्रवास करत होती. 
- तो म्हणाला की, त्यादिवशी केवळ संग्राम बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत होता. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, पायलने केलेले ट्वीट्स आणि पायल संग्राम यांचे PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)