आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पीपली लाइव्ह'च्या सहदिग्दर्शकास अटक, बलात्कार केल्याचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शेतकरी आत्महत्येवर आधारित "पीपली लाइव्ह' या चित्रपटाचे सहदिग्दर्शक मेहमूद फारुकी यांना महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

३० वर्षीय भारतवंशीय अमेरिकन महिलेने त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ही महिला कोलंबिया विद्यापीठात रिसर्च स्कॉलर आहे. दरम्यान, फारुकी यांना न्यायालयाने ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने १९ जून रोजी तक्रार दाखल केली होती आणि शनिवारी त्यांना अटक करण्यात आली. मेहमूद फारुकी हे ‘पीपली लाइव्ह’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका अनुषा रिझवी यांचे पती आहेत. पीडित महिलेशी फारुकी यांची वाराणसीत भेट झाली होती. त्या ठिकाणी ती महिला बाबा गोरखनाथ यांच्याशी संबंधित संशोधनकार्यासाठी आली होती. फारुकी मदतीच्या बहाण्याने सुखदेव विहारात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी बलात्कार केला, असे त्या महिलेने सांगितले. या प्रकरणाविषयी फारुकी यांच्या पत्नीलाही माहिती असल्याचेही ती म्हणाली. मेहमूद फारुकी हे हे लेखकही असून "दास्तांगोई' या कथाकथन प्रकारामुळे त्यांना बरीच लोकप्रियता मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...