आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगत्जेत्या विश्वनाथन आनंदसमोर परफेक्शनिस्ट आमिर खान पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - परफेक्शनिस्ट आमिर खानला त्याच्या प्रत्येक परफेक्ट मुव्हसाठी ओळखलं जातं. पण आपल्या चित्रपट कारकिर्दीत परफेक्ट खेळी साठी प्रसिध्द असलेल्या ह्या अभिनेत्याला जगत्जेत्या विश्वनाथन आनंदसमोर मात्र नुकतीच हार मानावी लागलीय.

राज्यात बुध्दिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र चेस लीग म्हणजेच (MCL) सध्या प्रयत्नशील आहे. आणि त्यामुळेच आपल्या करीयरमध्ये परफेक्शनिस्ट असलेल्या जगत्जेता बुधि्दबळपटू विश्वनाथन आनंद आणि अभिनेता आमिर खान या दोन दिग्गजांना एमसीएलने शुक्रवारी एका कार्यक्रमात विशेष आमंत्रण दिलं होतं. त्यावेळी आमिरने आनंदसोबत वुधि्दबळ खेळण्याचा आव्हान स्विकारलं खरं मात्र तोंडघशी पडायलाच.

कदाचित, आमिर खानला ही विश्वनाथन आनंदसमोर आपली हार होणार हे ठाऊकच होतं. किंबहूना आज हारताना जगत्जेत्याकडून त्याने पुढील काळातल्या आपल्या खेळीसाठी काही परफेक्ट मुव्हज करण्यासाठीच्या टिप्सही घेतल्या असाव्यात.