आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूर यांच्या निधनाने पाकिस्तानातील चाहते शोकाकूल, 'कपूर हवेली'त वाहिली श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानमध्ये चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराला वाहिली श्रद्धांजली - Divya Marathi
पाकिस्तानमध्ये चाहत्यांनी आपल्या लाडक्या कलाकाराला वाहिली श्रद्धांजली

मुंबई- अभिनेते शशी कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. भारतातच नव्हे तर इतर देशांतील चाहत्यांनीसुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानमध्ये कपूर कुटुंबाच्या वडिलोपार्जित घराजवळसुद्धा या महान अभिनेत्याच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

जुन्या पेशावर शहरातील किस्सा खवानी बाजार येथे कपूर कुटुंबीयांचे हे वडिलोपार्जित घर आहे. शशी कपूर यांचे आजोबा बाशेश्वरनाथ यांनी 1918 मध्ये ही हवेली बांधली होती. फाळणीनंतर कपूर कुटुंब भारतात स्थायिक झाले होते. 


अम्मारा अहमद यांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी अहमद यांचे ट्विट रिट्विट करत याविषयीची माहिती सर्वांना दिली.


- 4 डिसेंबर रोजी वयाच्या 79 व्या वर्षी शशी साहेबांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
- 5 डिसेंबर रोजी शशी कपूर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले.  
- 18 मार्च 1938 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण आणि 2015 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. 
- शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर यांचे 1984 मध्ये कॅन्सरमुळे निधन झाले होते. पत्नीच्या निधनानंतर शशी कपूर एकटे पडले होते. त्यांनी सिनेसृष्टीपासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती. या दाम्पत्याला कुणाल, करण आणि संजना ही तीन मुले आहेत.


पुढील स्लाईड्सवर बघा, पाकिस्तानमधील संबंधित छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...