आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phone And Family Banned On The Sets Of Mohenjodaro

‘मोहनजोदडो’ च्या सेटवर फोन वापरण्यास मनाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक आशुतोषच्या या नियमाचे पालन करण्यास हृतिकनेदेखील सहमती दर्शवली आहे.
चित्रपटांच्या शूटिंगवेळची सेटवरील दृश्ये लिक होऊ नयेत म्हणून संजय लीला भन्साळी फोन, स्टारकास्टच्या कुटुंबीयांना नो एंट्रीचा फंडा राबवत असत. आता आशुतोष गोवारीकर यांनी ‘मोहनजोदडो’साठी हा फंडा वापरल्याचे दिसते. आशुतोषनी ‘मोहनजोदडो’साठी पहिल्यापासून बरीच गुप्तता बाळगली आहे. शूटिंग सुरू असलेल्या या चित्रपटाची सेटवरील दृश्ये लीक होऊ नयेत म्हणून त्यांनी सेटवर फोन वापरण्यास टीमला मनाई केली आहे. दुखापतीमुळे काही दिवस विश्रांती करत असलेल्या हृतिकने दोनच दिवसांपूवर्पी पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. या वेळी त्यानेदेखील कोणतेही आढेवेढे घेता आशुतोष यांच्या नियमांचे पालन केले. दरम्यान आशुतोषने हृतिकच्या कुटुंबीयांना सेटवर येण्यासदेखील मनाई केली आहे. यावरदेखील हृतिकने आक्षेप घेतला नसल्याचे समजते.