आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Party Photograph Of Actress Kritika Chaudhari Become Important Evidence

या फोटोमध्ये लपले आहे अॅक्ट्रेस कृतिकाच्या मृत्यूचे गूढ, 5 जूनला केली होती बर्थ डे पार्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस कृतिका चौधरी(डावीकडे), कृतिकाच्या बर्थडे पार्टीचा फोटो (उजवीकडे). लाल वर्तुळात कृतिका. - Divya Marathi
अॅक्ट्रेस कृतिका चौधरी(डावीकडे), कृतिकाच्या बर्थडे पार्टीचा फोटो (उजवीकडे). लाल वर्तुळात कृतिका.
मुंबई - अॅक्ट्रेस कृतिका चौधरीची हत्या झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून सिद्ध झाले आहे. सोमवारी पोलिसांना संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह आढळला होता. अंबोली पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांना 5-6 जूनचा एक फोटो भेटला आहे. त्यात कृतिका फ्रेंड्सबरोबर बर्थडे पार्टी एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. 

फोटोत लपले आहे मृत्यूचे गूढ 
- कृतिकाचा मृतदेह पोलिसांना 12 जूनला आढळला आणि पोलिसांना असा संशय आहे की, 5 दिवसांपूर्वी तिची हत्या झाली असावी. 5 जूनला कृतिकाचा बर्थडे होता. 
- पोलिसांना कृतिकाच्या बर्थडे पार्टीचा एक फोटो मिळाला आहे. त्यात ती पिवळ्या ड्रेसमध्ये अत्यंत आनंदी दिसत आहे. तिच्याबरोबर दौन मैत्रिणी आणि तीन मित्रही या फोटोत आहेत. 
- सुत्रांच्या मते हा फोटो कृतिका मर्डर केसमध्ये अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. हा फोटो कृतिकाची हत्या झाली त्या दिवसाचा किंवा त्याच्या एक दिवस आधीचा असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
 
बॉडीवर पंजासारख्या शस्त्राचे घाव 
- पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार कृतिकाची हत्या पाच बोटात घातल्या जाणाऱ्या धारदार पंजाद्वारे केल्याचे समोर येत आहे. 
- पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. 
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृतिकाच्या शरिरावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, हत्येपूर्वी तिच्याबरोबर मारहाण करण्यात आली होती.  
- सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. 
- दुसरीकडे हत्येचा हा गुंता सोडवण्याची जबाबदारी मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायकला सोपवली आहे. 
- मुंबई पुलिसांचे एसपी अरुण चव्हाण यांच्या मते प्रकरणाची चौकशी करणाऱ्या टीमकडे अनेक लीड्स आहेत आणि त्याआधारेच तपास सुरू आहे. 

डोक्यावर आढळल्या जखमा 
- कृतिकाच्या डोक्यावर जखमा आढळल्या तसेच खोलीचा एसी 19 वर होता. 
- त्यावरून मुद्दाम मृतदेह लवकर सडू नये म्हणून एसी जास्त थंड ठेवल्याची शंका पोलिसांना आहे. 
- कृतिकाचा मृतदेह पोलिसांना सोमवारी तिच्या अंधेरीमधील चार बंगला परिसरातील घरात आढळला होता. 
- शेजाऱ्यांनी दुर्गंध येत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दार तोडून तिचा मृतदेह बाहेर काढला होता. 

संपूर्ण कुटुंब धक्क्यात.. 
- कृतिकाच्या मृत्यूच्या वृत्तानंतर संपूर्ण कुटुंब धक्क्यात आहे. तिचे वडील मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर म्हणाले, अभिनयाच्या आवडीनेच माझ्या मुलीचा जीव घेतला. 
- कृतिकाच्या मृत्यूची बातमी मिळताच तिची आई आणि भाऊ मुंबईला रवाना झाले आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कृतिकाचे आणखी काही Photos.. 
बातम्या आणखी आहेत...