आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बॉलिवूडने भारतीय सैनिकांना केला सलाम, #SaluteSelfie बनला ट्रेंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्वातंत्र्य दिनानिमित्ताला आणखी खास बनवण्यासाठी बॉलिवूड स्टार्स गेल्या दोन-तीन दिवसांपासून सॅल्यूट सेल्फी शेअर करत आहेत. या सेल्फीमध्ये स्टार्स भारतीय जवानांना सलाम करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, शाहिद कपूर, सुष्मिता सेनसह अनेक बॉलिवूड इंडस्ट्रीशी निगडीत सेलेब्सने सॅल्यूट सेल्फी पोस्ट केले आहेत.
काय आहे SaluteSelfie
भारतीय कंपनी रिलायन्स फाऊंडेशनव्दारा सुरु करण्यात आलेल्या या अनोख्या अभिनयामध्ये स्वातंत्र्य दिवसावर अनेक सेलेब्स #SaluteSelfieने आपआपल्या अंदाजात भारतीय जवानांना सलामी देत आहेत. स्टार्ससोबत सामान्य लोकसुध्दा या अभिनयाची प्रशंसा करत आहेत आणि यात सहभाग घेत आहेत. मागील दोन दिवसांपासून #SaluteSelfie टि्वटरवर ट्रेंड करत आहे.
अमिताभ बच्चन यांनी केले सपोर्ट
महानायक अमिताभ बच्चन या पुढाकारासाठी समोर आले आहेत. गुरुवारी (6 ऑगस्ट) त्यांनी आपल्या सॅल्यूट सेल्फी सादर केले. सोबतच कॅप्शन लिहिले, 'We salute our brave Armed Forces #SaluteSelfie ... a small tribute .. a few lines from my Father..'
शाहरुखने आर्मीला केले सलाम-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने भारतीय सैनिकांना सलाम करून मंगळवारी (11 ऑगस्ट) टि्वटरवर एक सेल्फी शेअर केला आहे. एसआरकेने सेल्फीसोबत कॅप्शन लिहिले, 'Salute 2 r Armed Forces, who selflessly risk their lives 2 protect our beloved country & our families. #SaluteSelfie.'
शाहिद कपूरने शेअर केले स्टाइलिश सेल्फी-
अभिनेता शाहिद कपूरनेसुध्दा रिलायन्स फाऊंडेशनच्या या अनोख्या अभियानाला आपल्या स्टाइलिश अंदाजात सपोर्ट केले. त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून लिहिले, '#SaluteSelfie acknowledging the selfless , brave heroes #IndianArmy.'

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्स आणि भारताच्या प्रसिध्द खेळाडूंनी पोस्ट केलेले Salute Selfie...