आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos: Busy Akshay Spends Quality Time With His Cute Family

PHOTOS: \'गब्बर\' अक्षय कुटुंबीयांसोबत असे घालवतो निवांत क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: ट्विंकल खन्ना, डिंपल कपाडिया, नितारा खन्नासोबत अक्षय कुमार)
मुंबईः अभिनेता अक्षय कुमारचा 'गब्बर इज बॅक' हा सिनेमा शुक्रवारी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. कृष यांनी दिग्दर्शित केलेल्या या अॅक्शन थ्रिलर सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. यावर्षी रिलीज झालेला अक्षयचा हा दुसरा सिनेमा आहे. 'गब्बर इज बॅक'पूर्वी अक्षयचा 'बेबी' हा सिनेमा यावर्षी रिलीज झाला होता. सध्या तो 'ब्रदर्स' आणि 'सिंग इज ब्लिंग' या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
तसे पाहता, अक्षयच्या एकामागून एक रिलीज होणा-या सिनेमांकडे बघता तो बी टाऊनचा सर्वाधिक बिझी स्टार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सिनेमांव्यतिरिक्त अक्षय जाहिरांतीमध्येही बिझी असतो. आपल्या एवढ्या बिझी शेड्युलमधून अक्षय आपल्या कुटुंबासाठी वेळ काढायला मुळीच विसरत नाही. बिझी शेड्युलमधून वेळ काढत तो पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांना कधी शॉपिंगला तर कधी आउटिंगला नक्की घेऊन जात असतो.
ट्विंकलसाठी असतो नेहमी फ्री...
अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. मात्र आजही अक्की ट्विंकलसाठी आवर्जुन वेळ काढत असतो. अवॉर्ड फंक्शन असो किंवा पार्टी, अक्षय नेहमी ट्विंकलसोबत दिसतो. याशिवाय हे दोघे अनेकदा फिल्म्स बघायला थिएटरमध्येदेखील येत असतात. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अक्षय परदेशात सुटी एन्जॉय करायला जात असतो.

मुलगा आरवला देता अधिक वेळ...
अक्षयचा मुलगा आरव आता 12 वर्षांचा झाला आहे. या वयात आपल्या मुलाला वडिलांची जास्त गरज आहे, हे अक्षय ठाऊक आहे. आरवसोबत अक्षय एका मित्रासारखा वागतो. तो अनेकदा त्याला सिनेमे दाखवायला घेऊन जातो. अक्षयला स्वतः खेळाची विशेष आवड आहे, ही आवड त्याच्या मुलालासुद्धा आहे. फावल्या वेळेत अक्षय आरवसोबत व्हॉलीबॉल खेळतो.
अक्षयची लाडकी आहे नितारा...
अक्षय कुमारची मुलगी नितारा आता अडीच वर्षांची झाली आहे. अक्षय आपल्या मुलीसोबतची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करत असतो. यावर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी अक्षयने नितारासोबत पतंग उडवतानाचे एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबतची अक्षयची खास झलक...