आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PHOTOS: Emraan Hashmi Amrya Dastur Promtes 'Mr. X'

INTERVIEW: इमरान हाश्मीच्या 'Serial Kisser' इमेजमुळे घाबरली होती अमायरा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे इमरान हाश्मी आणि उजवीकडे अमायरा दस्तूर)
मुंबईः इमरान हाश्मी स्टारर 'मिस्टर एक्स' हा सिनेमा आज (17 एप्रिल) बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. इमरान आणि या सिनेमाची हिरोईन अमायरा दस्तूर यांनी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. गुरुवारी दुपारी हे दोघेही सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने Divyamarathi.comच्या ऑफिसमध्ये पोहोचले. या मुलाखतीत अमायराने उघड केले, की इमरानसोबत किसींग सीन्स देताना ती मुळीच कम्फर्टेबल नव्हती.
'मिस्टर एक्स' सिनेमाशी निगडीत पाच स्पेशल गोष्टी शेअर करताना इमरानने सांगितले, की सिनेमात प्रेक्षकांना उत्कृष्ट GFX, उत्कृष्ट बाइक स्टंट्स, अंडरवॉटर शूट, अदृश्य व्यक्तीची अनयुजुअल स्टोरी आणि कधीही न पाहिलेले थ्री डी इफेक्ट्स बघायला मिळतील.
'इशक' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या अमायराचा हा दुसरा हिंदी सिनेमा आहे. या सिनेमात सीरिअल किसरची इमेज असलेल्या इमरानसोबत काम करताना अनुभव कसा होता ? असा प्रश्न विचारला असता, ती म्हणाली, "मला हा सिनेमा ऑफर झाला तेव्हा मी खूप घाबरले होते. इमरानसोबत काम करण्याविषयी मी खूप कॉन्शिअस झाले होते. मात्र महेश भट यांनी सांगितले, की सिनेमात तीन किसींग सीन्स असतील. त्यापैकी एक इमरानसोबत आणि दोन व्हर्च्युअल किस असतील. शूटिंगदरम्यान इमरानसोबत नव्हे तर व्हर्च्युअल किस देताना मी अनकम्फर्टेबल झाले होते."
या मुलाखतीदरम्यान अमायरा आणि इमरान यांना फोटो प्रिंटेड कप साइ करण्यासाठी देण्यात आले. अमायराने स्पेशल पद्धतीने इमरानचा कप साइन केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा Divyamarathi.comच्या ऑफिसमध्ये पोहोचलेल्या इमरान हाश्मी आणि अमायरा दस्तूरची खास छायाचित्रे...