मुंबई- रॅपर
यो यो हनी सिंगने अलीकडेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. शिवाय त्याने जिममधील काही फोटोसुध्दा शेअर केले आहेत. विशेष म्हणजे, हनीने एक आठवड्यांपूर्वी इंस्टाग्रामवर एंट्री केली आहे.
पहिला फोटो हनी सिंगने गुरुनानकचा पोस्ट केला आणि त्यानंतर स्वत:चा एक फोटो शेअर केला. त्या फोटोवर लिहिले, 'AM ON INSTA NOW #FOLLOW ME'. हनी सिंगने मागील वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून गायब झाला होता. मात्र अचानक त्याचे काही फोटो समोर आले.
कधी तो खटल्यादरम्यान नागपूरच्या एका पोलिस ठाण्यात दिसला तर कधी तो डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी दिल्लीच्या एका रुग्णालयात दिसला. यादरम्यान त्याला 45 दिवस बेड रेस्टचा सल्ला दिला होता. आता हळू-हळू म्यूझिक आणि बॉलिवूडमध्ये परतण्यासाठी तो तयारी करत आहे. मार्चमध्ये त्याचे 'वन बॉटल डाऊन' हा नवा व्हिडिओ रिलीज झाला. हा व्हिडिओ आतापर्यंत 46 लाख लोकांनी पाहिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हनी सिंगच्या जिम अॅक्टीव्हिटीजचे फोटो...