(शूटिंगदरम्यान शमशुद्दीन इब्राहिम आणि मनीशा कोइराला)
कर्करोगावर मात करून अभिनेत्री मनीषा कोइराला आता कमबॅकसाठी तयार झाली आहे. तिने 'Oru Melliya Kodu' या तामिळ सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. सिनेमाचे काही ऑन-लोकेशन फोटो समोर आले आहेत. एका फोटोमध्ये मनीषा दाक्षिणात्य अभिनेता शमशुद्दीन इब्राहिमसोबत लग्नाच्या मंडपात बसलेली दिसतेय. सिनेमामध्ये दोघांचे काही बोल्ड सीन्ससुध्दा आहेत. सोबतच एका फोटोमध्ये मनीषा चाकूसोबत पोज देताना दिसत आहे.
रिपोर्ट्सनुसार, कन्नडी आणि तामिळ सिनेमाचे दिग्दर्शक एमआर रमेशचा हा सिनेमा हायप्रोफाइल सुनंदा पुष्कर मर्डर केसवर आधारित आहे. सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'Oru Melliya Kodu'च्या शूटिंगदरम्यानचे मनीषा कोइराला आणि शमशुद्दीन इब्राहिमचे काही PHOTOS...