आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हा आहे शिल्पा-राजचा 'राज महल', 100 कोटींहून अधिक आहे किंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लंडनस्थित राज महल आणि इनसेटमध्ये राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध बिझनेसमन राज कुंद्रा यांच्यावर क्रिकेटशी कोणत्या प्रकारचा संबंध ठेवण्यास अजीवन बंदी घालण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधिश आर. एम. लोढा यांनी मंगळवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. सोबतच राज कुंद्रा यांच्या राजस्थान रॉयल्स या संघालाही पुढील 2 वर्षासाठी निलंबित केले आले आहे. ब्रिटनच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या राज कुंद्रा यांची गणना जगभरातील यशस्वी बिझनेसमनमध्ये केली जाते. वयाच्या 18व्या वर्षी राज यांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. आज ते ट्रेडिंग, कंस्ट्रक्शन, रिअल इस्टेट, एनर्जी, स्टिल, शेअर्स, मीडिया, स्पोर्ट्स आणि गोल्ड ट्रेडिंगशी निगडीत जवळजवळ 10 कंपन्यांचे मालक किंवा भागीदार आहेत. राज यांना 2004 मध्ये एका ब्रिटीश मॅगझिनने सर्वात श्रीमंत आशियाई ब्रिटीशच्या यादीत 198 वे स्थान दिले होते.
राज आणि 'राज महल'
राज यांचे देश आणि परदेशात अनेक बंगले आहेत. मात्र ब्रिटनमधील 'राज मह'ल हे त्यांचे नेहमीच आवडते घर राहिले आहे. 2006 मध्ये त्यांनी हा बंगला त्यांची पहिली पत्नी कवितासाठी खरेदी केला होता. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. 2009 मध्ये शिल्पाने राजसोबत लग्न केले आणि ती या राज महलाची राणी बनली. 2013 मध्ये या बंगल्याची किंमत 100 कोटी इतकी होती. आजच्या तारखेला या बंगल्याची किंमत जवळजवळ 125 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जाते.
कसा आहे 'राज महल'
लंडनस्थित सेंट जॉर्ज हिलस्थित राज महल नावाच्या या बंगल्याचे दोन एन्ट्रेस आहेत. याचे इंटेरिअर स्वतः शिल्पाने केले होते. या घरात दोन मोठे हॉल, दोन रिसेप्शन हॉल, सात लग्झरी बेडरुम, स्वीमिंग पूल, मोठे कार गॅरेज, तीन बाल्कनी आणि एक मोठे गार्डन आहे.
राज यांनी विकला होता हा बंगला
विशेष गोष्ट म्हणजे पहिली पत्नी कवीतासोबत घटस्फोट झाल्यानंतर राज यांनी हे घर विकले होते. त्यावेळी जवळजवळ 54 कोटींत त्यांनी हा बंगला विकला होता. मात्र शिल्पासोबत लग्न झाल्यानंतर तिच्या आग्रहाखातर त्यांनी तो पुन्हा खरेदी केला. शिल्पाने या बंगल्याचे रुप बदलले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या बंगल्याची खास छायाचित्रे...