आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 33 वर्षांचा झाला रणबीर कपूर, पाहा बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे निवडक PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणबीर कपूर, बहीण रिद्धिमा, वडील ऋषी आणि आई नीतूसोबत - Divya Marathi
रणबीर कपूर, बहीण रिद्धिमा, वडील ऋषी आणि आई नीतूसोबत

मुंबईः बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर 33 वर्षांचा झाला आहे. 28 सप्टेंबर 1982 रोजी मुंबईत अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांच्या घरी त्याचा जन्म झाला. रणबीरला एक थोरली बहीण असून रिद्धिमा कपूर साहनी हे तिचे नाव आहे. बॉलिवूडच्या मोस्ट एलिजिबल बॅचलर्समध्ये गणला जाणारा रणबीर बालपणी खूप क्यूट दिसायचा. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या बालपणीच्या छायाचित्रांमध्ये त्याचा क्यूटनेस बघायला मिळतो. या छायाचित्रांमध्ये रणबीर त्याचे आईवडील, सख्खी बहीण, चुलत बहिणी आणि आजीआजोबांसोबत दिसतोय.
रणबीरने मुंबईतील माहीमस्थित बॉम्बे स्कॉटिश शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. एकदा त्याने सांगितले होते, तो अभ्यासात खूप मागे होता. आपल्या वर्गात तो मागून टॉप 5 मध्ये असायचा. रणबीरने न्यूयॉर्कच्या स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्ट्समधून फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण केला आहे. सोबतच स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे बारकावे शिकला.
2005 मध्ये 'ब्लॅक' या सिनेमासाठी त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. 2007 मध्ये संजय लीला भन्साळींच्या 'सांवरिया' या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून ते आत्तापर्यंत रणबीर जवळजवळ 18 सिनेमांमध्ये झळकला आहे. त्याचा आगामी 'तमाशा' हा सिनेमा येत्या 27 नोव्हेंबरला रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रणबीरची बालपणीपासून ते आत्तापर्यंतची निवडक छायाचित्रे...