आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: शूटिंगदरम्यान चाहत्यांसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसला टायगर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटिंग करताना टायगर श्रॉफ)
मुंबई- 'हिरोपंती'च्या यशानंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी तो सिनेमात नव्हे तर पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या नवीन म्यूझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे.
अलीकडेच, टायगर मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीमध्ये नवीन म्यूझिक अल्बमची शूटिंग करताना स्पॉट झाला होता. यादरम्यान त्याचे चाहत्यांसोबत डान्स केला, त्यांच्याशी बातचीतसुध्दा केली होती. टायगरने चाहत्यांना काही स्टंट्सही करून दाखवले.
यानिमित्त टायगर श्रॉफसोबत पाकिस्तानी गायक अतिप अस्लम, टी-सीरीजचे चेअरपर्सन भूषण कुमार आणि कोरिओग्राफर अहमद खानसुध्दा उपस्थित होते.
टायगर प्रसिध्द गायक अतिफ अस्लमच्या 'जिंदगी आ रहा हू मै' या अल्बममध्ये झळकणार आहे. यात तो काही मुले आणि चाहत्यांसोबत डान्स करताना दिसेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टायगरच्या नवीन म्यूझिक अल्बमचे On-Location Photos...