आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान हवेत असतानाच खिडकीबाहेर लटकला पायलट, क्रू ने असे वाचवले प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रू मेंबर्सने लटकलेल्या पायलटला असे पकडले होते. - Divya Marathi
क्रू मेंबर्सने लटकलेल्या पायलटला असे पकडले होते.
सध्याच्या काळात लोकांना विमानाने प्रवास करायला फार आवडते. त्याचे कारण म्हणजे वेळेची बचत. तसे पाहता विमानाने प्रवास करणे हे अत्यंत सुरक्षित समजले जाते. पण तरीही अनेक अपघात होत असतात. त्यात विमान अपघातात प्राण वाचण्याची शक्यताही कमी असते. पण 1990 मध्ये  ब्रिटिश एअरवेजच्या एका फ्लाइटमध्ये असे काही घडले होते की, त्याची कल्पना कदाचितच कोणी केली असेल. 

खिडकीबाहेर लटकला होता पायलट 
इंग्लंडच्या बर्मिंगहमहून मालगाकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या फ्लाइटमध्ये बिघाड झाल्याने पायलटचे प्राण संकटात अडकले होते. 42 वर्षांचा कॅप्टन टिम लंकास्टर आणि 39 वर्षांचा को पायलट अॅलास्टर अॅश्टियन दोघांनी सकाळी साडे सात वाजता उड्डाण घेतले. सर्व काही नॉर्मल होते, पण अचानक 15 मिनिटांनी त्यांना आकाशात एक जोरदार धमाका झाल्याचे ऐकू आले. टिम यांच्या समोरचे विंडशिल्ड अचानक विमानापासून वेगळे झाले होते. त्यामुळे कॉकपिटमध्ये डीकंप्रेशन झाले आणि कोणाला काही समजण्याआधीच टिम विमानाच्या बाहेर लटकला होता. टीमचे संपूर्ण शरीर विमानाबाहेर होते. जमिनीपासून 23 हजार फूट उंचीवर टिमची बॉडी हवेत इकडे तिकडे ओढली जात होती. 

क्रू मेंबर्सने वाचवले प्राण 
टिम यांचे नशीब चांगले होते म्हणून दुर्घटनेच्या वेळी फ्लाइट अटेंडंट निगेल ओगडेन डेकजवळ उभे होते. त्यांनी लगेचच येत टीमचे पाय पकडले. थोड्या वेळाने निगेल थकला तेव्हा दुसऱ्या फ्लाइट अटेंडंट साइमन रोजर्सने येऊन मोर्चा सांभाळला. क्रू मेंबर्सला वाटत होते की, इतकावेळ विमानाबाहेर लटकल्याने टीमचा मृत्यू झाला असेल. कारण त्याचे डोके सारखे विमानावर आदळत होते. पण त्याचे शरीर जर इंजिनजवळ गेले तर त्याला वाचवणे कठीण होईल, हे क्रू मेंबर्सला माहिती होते. 

इमर्जन्सी लँडिंग करावी लागली 
क्रू ने प्लेनची इमर्जम्स लँडिंग केली. 22 मिनिटांपर्यंत टिमने हवेत मृत्यूशी लढा दिला. त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आले. किमला फ्रॉस्टबाईटशिवाय हात आणि मनगटात फ्रॅक्चर आले होते. अॅक्सिडेंटच्या पाच महिन्यांनंतर टिम कामावर परतले. या अपघातानंतर ब्रिटीश एअरवेजने विंडशिल्डचे डिझाइन बदलले होते. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या अपघाताचे इतर काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...