आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय योगदिनी मनीषा कोईराला देणार मुलांना योगाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगिवद्या साहाय्यभूत असून शिक्षणात देखील योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची मनोमन खात्री पटलेल्या राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २१ जून या आंतरराष्ट्रीय योगदिनी राज्यात योगविद्येबाबत जागृती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी नेमलेल्या समितीवर अभिनेत्री मनिषा कोईराला हिला स्थान देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी सांगितले.


आंतरराष्ट्रीय योगदिनाचा लाभ उठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये योग विद्येबाबत व्यापक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याबाबतचे नियोजन करण्यासाठी व उपक्रम सुचवण्यासाठी योग विषयातील तज्ञ व शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांची एक भलीमोठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या डॉ. श्रीराम सावरीकरांचा सहभाग : या समितीत राज्यातील सर्वच योग तज्ज्ञांना स्थान देण्यात आले अाहे. समितीचे अध्यक्षपद दादरच्या समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे यांना देण्यात आले अाहे. त्याचप्रमाणे योगविद्या गुरुकुल नाशिकचे विश्वास मंडलिक, विवेकानंद केंद्र मुंबईचे अभय बापट, एमसीआयएम औरंगाबादचे डॉ. श्रीराम सावरीकर, अरुण खोडस्कर, दि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ योगाच्या पल्लवी कव्हाने, योग पॉईंट नाशिकचे गंधार मंडलीक, अमरावतीचे डॉ.विनय देशमुख, योगाभ्यासी मंडळ नागपूरचे राम खांडवे, कैवल्यधाम लोणावळयाचे सुबोध तिवारी, योगविद्याधाम पुण्याचे प्रमोद निफाडकर, प्राथमिक व माध्यमिकचे िशक्षण संचालक अशा २४ सदस्यांचा समितीमध्ये समावेश आहे. या जम्बो समितीमध्ये विशेष निमंत्रक म्हणून राज्याच्या प्रशासकीय न्यायाधीकरणाचे (मॅट) चे अध्यक्ष न्या.अंबादास जोशी, सेवा भारती आसामचे भास्कर कुलकर्णी, व प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोईराला यांचाही समावेश करण्यात आला आहे.

भूकंपाचे प्रशिक्षण
नेपाळ येथे झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर देशासह महाराष्ट्रातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. अशा परिस्थितीत शाळेतील शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे तावडे म्हणाले.

समितीची कार्यकक्षा
आंतरराष्ट्रीय योगदिनी (२१ जून) राज्यातील शाळांमध्ये योग महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा ठरवणे, तालुका व जिल्हा स्तरावर योग महोत्सवाचे नियोजन करणे, योग महोत्सवामध्ये राबवण्यासाठी अभ्यासक्रमेतर उपक्रम सुचवणे आदी कामे या समितीकडे दिलेली आहेत.