आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वयाच्या 13 व्या वर्षी सक्सेस, 19 व्या वर्षी मोडले पहिले लग्न, अशी आहे सुनिधीची स्ट्रगलिंग Life

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 1996 मध्ये दुरदर्शनवर प्रसारित होणा-या 'मेरी आवाज सुनो' या रिअॅलिटी शोमध्ये एका चिमुकलीचा आवाज ऐकून मोठमोठे गायक अचंबित झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चिमुकलीच्या आवाजाने गानकोकिळा लता मंगेशनकर यांनासुद्धा मोहिनी घातली होती. ही लहानगी दुसरी तिसरी कुणी नाही तर आजची आघाडीची पार्श्वगायिका सुनिधी चौहान होती. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सुनिधी मंदिरात गाणी गाऊ लागली होती. वयाच्या 13 व्या वर्षी तिला पहिले यश मिळाले आणि 19 व्या वर्षी लग्न तुटल्याचे दुःख तिला सोसावे लागले. असा झाला दिल्ली ते मुंबईपर्यंतचा प्रवास...
सुनिधी चौहानला आज वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. एक प्लेबॅक सिंगर म्हणून सुनिधीने जे स्थान मिळवले आहे, ते नक्कीच कौतुकास्पद आहे. 14 ऑगस्ट 1983 रोजी दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. वयाच्या केवळ चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते. शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला.

वयाच्या 13 व्या वर्षी मिळाली होती सिनेमात गाण्याची पहिली संधी.... वाचा पुढील स्लाईडवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...