आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुराग कश्यपचा PM मोदींना सवाल - PAK दौऱ्यासाठी माफी का नाही मागितली ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुराग कश्यप, करण जोहरच्या समर्थनार्थ पुढे आला आणि त्याने पीएम मोदींना पाच प्रश्न विचारुन तुमच्या \'चुप्पी\' मुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले. - Divya Marathi
अनुराग कश्यप, करण जोहरच्या समर्थनार्थ पुढे आला आणि त्याने पीएम मोदींना पाच प्रश्न विचारुन तुमच्या \'चुप्पी\' मुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले.
मुंबई - चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने 'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रदर्शनाची पाठराखण करत करण जोहरला पाठिंबा दर्शविला आहे. रविवारी अनुरागने नरेंद्र मोदींना पाच प्रश्न विचारले आहे. ट्विटरवरुन विचारलेल्या प्रश्नात पहिल्या ट्विटमध्ये अनुराग विचारतो, 'सर, तुम्ही अजून पाकिस्तानात जाऊन त्यांच्या पंतप्रधानांची भेट घेतल्याबद्दल माफी मागितलेली नाही, तर त्याच दरम्यान 25 डिसेंबरला करण जोहर 'ऐ दिल है मुश्किल'चे शुटिंग करीत होता.' दुसऱ्या एका ट्विटमध्ये अनुरागने मोदी शांत आहेत म्हणूनच आम्हाला अशा परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे.

अनुरागने मोदींना कोणते प्रश्न विचारले
- अनुराग कश्यपने लिहेले आहे, 'तुम्ही (मोदी) शांत आहात, त्यामुळे अशा परिस्थितीचा आम्हाला सामना करावा लागत आहे.'
- तिसऱ्या ट्विटमध्ये तो लिहितो, 'वास्तविक तुम्ही आमच्या टॅक्सच्या पैशातून तुमचा दौरा केला, तेव्हा होत असलेल्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी त्या लोकांचा पैसा लागला आहे, ज्यांना त्यात इंटरेस्ट होता.'
- चौथ्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'मी फक्त परिस्थितीची जाणीव करुन देत आहे, वास्तविक काय करावे हे मला कळत नाही, तुम्हाला जर राग आला असेल तर क्षमा करा.'
- पाचव्या ट्विटमध्ये, 'भारत माता की जय सर,' लिहिले आहे.
काय आहे प्रकरण
- सिनेमा ओनर्स एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (COEAI) पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सीओईएआय या चित्रपटगृह मालकांच्या संघटनेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि गोव्यात पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्याचा मोठा फटका 28 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाला बसू शकतो. करण जोहर यांच्या या चित्रपटात पाक अभिनेता फवाद खानची महत्त्वाची भूमिका आहे.
- पाक कलाकारांच्या चित्रपटांना होत असलेल्या विरोधाविरोधात ओम पुरी आणि प्रियंका चोप्रांनीही उडी घेतली आहे. हा विरोध चुकीचा असल्याचे ते म्हणाले.

सरकारलाच निर्णय घेऊ द्या : ओम पुरी
कलाकारच नव्हे तर नातेवाइकांच्या भेटी व उद्योगासाठी आलेल्या पाकिस्तानींनी परत जावे, असे सरकारने म्हणावे. देशाच्या प्रमुखालाच निर्णय घेऊ द्या.
- ओम पुरी, अभिनेता
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय म्हणाली प्रियंका...
बातम्या आणखी आहेत...