Home »News» Pok Is Pakistans Part And I Want To Go There Says Rishi Kapoor

ऋषि कपूर म्हणाले- ‘मरण्याआधी पाकिस्तान पाहू इच्छितो’, हे आहे त्यामागचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Nov 13, 2017, 12:01 PM IST

ऋषी कपूरने मरण्याअाधी एकदा पाकिस्तान पाहण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. त्यांनी एक ट्विट करत लिहिले आहे की,‘फारुक अब्दुल्ला जी, सलाम! सर, मी तुमच्या वक्तव्याशी सहमत आहे. जम्मू-काश्मीर आपले आहे, आणि पीओके त्यांचे. आपल्या समस्यांच्या समाधानाची हीच एक पद्धत आहे. मी 65 वर्षांचा आहे आणि मरण्याआधी पाकिस्तान पाहू इच्छित आहे. माझ्या मुलांनी आपली मुळे पाहावीत, अशी माझी इच्छा आहे. या कामाला प्राधान्य द्यावे, जय माता दी!’
खरंतर, ऋषी कपूर यांचे वडिलोपार्जित घर पाकिस्तानच्या पेशावर शहरात अाहे, ते कपूर हवेलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. ते घर पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी १९१८ आणि १९२२ मध्ये बनवले होते. मात्र कपूर कुटुंब १९४७ मध्ये झालेल्या फाळणीनंतर भारतात आले. ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांचा उल्लेख केला आहे. कारण नुकतेच ते म्हणाले होते, ‘पाक अधिकृत काश्मीर (पीओके) पाकिस्तानचा भाग आहे आणि ते पाकिस्तानकडून कोणी हिसकावू शकत नाही. काश्मीरचा जो भाग भारताजवळ आहे, तो भारताचाच भाग आहे. मग कितीही लढाई करावी लागली तर करू मात्र यात बदल हाेणार नाही. ऋषी कपूरने या ट्वीट नंतरच ट्वीट केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ऋषि यांचे ट्विट आणि त्याला आलेल्या रिअॅक्शन...

Next Article

Recommended