आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषी कपूर विरोधात तक्रार, ट्विटर अकाऊंटवर लहान मुलाचा न्यूड फोटो केला पोस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - चिंटू नावाने प्रसिद्ध असलेले अॅक्टर ऋषी कपूर यांच्या विरोधोता मुंबई पोलिस आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऋषी कपूर यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. हा फोटो एका लहान मुलाचा असून त्यात तो न्यूड दिसत आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडेही याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. जय हो फाऊंडेशनचे अॅडव्होकेट आदिल खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. सायबर सेलकडून मात्र अद्याप तक्रार मिळाल्याचा दुजोरा मिळालेला नाही. 
 
ट्वीटचा राम रहीम.. प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता..
ऋषी कपूर यांनी केलेले ट्वीट सध्या देशभरात चर्चेचा विषय असलेल्या बाबा राम रहीम यांच्या प्रकरणाशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण ट्वीटचा अन्वयार्थ एखाद्याचे चुकीचे अनुकरण केले की काय होते, असा दिसत आहे. तसेच ऋषी कपूर यांनी या ट्वीटच्या आधी केलेले दोन ट्वीटही राम रहीम यांच्या प्रकरणासंबंधी संताप व्यक्त करणारे होते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, ऋषी कपूर यांनी केलेले ट्वीट्स...
बातम्या आणखी आहेत...