आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायावर स्वस्तिक आणि अल्लाहचा टॅटू गोंदवणे पडले या अॅक्ट्रेसला महागात, FIR दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोल्ड अॅक्ट्रेस ते नन बनलेली सोफिया हयात आता कायदेशीर कचाट्यात सापडली आहे. अलीकडेच सोफियाने दोन्ही पायांच्या तळव्यावर स्वस्तिक आणि अल्लाहचा टॅटू गोंदवून घेतला. त्याचे फोटोज तिने इन्स्टाग्रामवर शेअऱ केले.  या फोटोवरुन तिच्यावर कडाडून टीकाच झाली नाही, तर तिच्याविरोधात मुंबईतील अमबोली पोलिस स्टेशनमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत अॅक्विस्ट अशद पटेल यांनी म्हटले, की सोफियाने पायावर धार्मिक टॅटू बनवून लोकांच्या भावनांना दुखावल्या आहेत. 

सोशल मीडियावर झाला विरोध...  
या फोटोमध्ये तिच्या दोन्ही पायांच्या तळव्यावर स्वस्तिक काढले आहे. या फोटोनंतर अनेकांनी संताप व्यक्त करत तिच्यावर टीका केली. टॅटूचा फोटो शेअर करताच युजर्सनी तिला चांगलेच खडसावले आहे. सोफियाच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन तिला विरोध दर्शवला आहे. काही लोकांनी सोफियाला देशातून बाहेर निघून जाण्यास सांगितले, तर काहींनी तिला लिगल नोटिस पाठवण्याची धमकी दिली आहे. आपल्या या फोटोमुळे कदाचित टीकेची झोड उठेल यामुळे तिने फोटोसोबत मोठी पोस्ट शेअर केली होती. पायाच्या तळव्यावर असणारे स्वस्तिक हे भगवान बुद्धांच्या पायांवर होते. एक पवित्र सनातन.. सुर्य..हिंदू.. स्वस्तिक...प्राचीन ख्रिश्चन क्रॉस..बुद्धिस्ट...यामध्ये सर्वकाही व्यापले आहे.. अशी एक लांबलचक पोस्ट फोटोसह शेअर केली होती. मात्र, त्याचा नेटिझन्सवर काहीच परिणाम झाला नसून सोफियावर जोरदार टीका केली आहे.
 
गेल्यावर्षी केली होती नन बनल्याची घोषणा... 
सोफियाने मागील वर्षी मे महिन्यात ती नन बनली असल्याची घोषणा केली होती. तिने तिचे सिलकॉन ब्रेस्टदेखील काढून टाकले होते. त्याचवेळी तिने हे देखील म्हटले होते की मी काही एका रात्रीतून नन होण्याचा निर्णय घेतलेला नाही. रिलेशनशिपमध्ये झालेल्या अपमानानंतर हे पाऊल उचलले असल्याचे तिने म्हटले होते. सोफिया म्हणाली होती, "आयुष्याला घाबरल्यामुळे तिच्यात हा बदल घडून आला आहे. दोन वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. एकवेळ मी इतक्या वाईट परिस्थितीत अडकले होते की, स्वत:ला संपविण्याचा विचार माझ्या मनात आला आहे. तसा प्रयत्नही मी केला होता. पण त्यानंतर मला एक अशी व्यक्ती भेटली की जिने माझे मत परिवर्तन केले. त्याने मला जाणीव करुन दिली की, आपले शरीर हे सूर्यापासून बनले आहे आणि सूर्य हाच ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे.''

जेव्हा सोफियाने घेतला U-turn, पुन्हा झाली बोल्ड...
नन बनल्यानंतर सफेद कपड्यांमध्ये ती दिसली होती. मात्र काही दिवसांतच ती तिच्या बोल्ड रुपात सोशल मीडियावर अवतरली होती. गेल्या काही दिवसांत तिने सेक्सी ड्रेसेससोबतच फक्त ब्रा घातलेले फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट केले होते. 

एकेकाळी अशी जगायचे आयुष्य... 
ब्रिटनची रहिवाशी असलेल्या सोफियाला जुलै 2012 मध्ये व्होग इटॅलियाने कर्वी आयकॉन हा खिताब दिला होता. सप्टेंबर 2013 मध्ये FHM मॅगझिनने तिला जगातील 81 वी मोस्ट सेक्सिएस्ट वुमन म्हणून गौरवले होते. बॉलिवूड पार्टी आणि रेड कार्पेट इव्हेंट्समध्ये सोफियाने आपल्या बोल्ड अंदाजाने प्रसिद्धी मिळवली आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावरसुद्धा तिचे अनेक बोल्ड आणि टॉपलेस फोटोज बघायला मिळतात.
 
सोफियाने लावले होते अरमान कोहलीवर आरोप... 
बिग बॉसच्या सातव्या पर्वात सहभागी झालेल्या सोफियाने शोमधील तिचा प्रतिस्पर्धक अरमान कोहलीवर छेडछाडीचा आरोप लावला होता. अरमानला बिग बॉसच्या घरातच अटक करण्यात आली होती. नंतर मात्र त्याची जामीनावर सुटका झाली होती.एकेकाळी सोफियाचं नाव क्रिकेटर रोहित शर्मासोबत जोडलं गेलं होतं.

पुढील स्लाईड्सवर बघा, सोफिया हयातचे टॅटू आणि सोबतच नेटिझन्सनी सुनावलेले खडे बोल... 
बातम्या आणखी आहेत...