आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियन कपिल शर्मावर आता वृक्ष तोडल्याचा आरोप, एका आठवड्यात दुसरी FIR

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कॉमेडियन कपिल शर्माविरोधात अंधेरीच्या तहसीलदारांंकडे तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. कपिलवर वृृक्षतोड केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याच्या विरोधात एका आठवड्यात ही दुसरी तक्रार आहे. कपिलवर एन्व्हानमेंट प्रोटेक्शन अॅक्ट, 1986 नुसार नैसर्गिक साधन संंपत्तीचे नुकसान केल्याचा आरोप आहे. दरम्यान, कपिल आणि इरफान खानविरुद्ध अवैध बांंधकाम केल्याप्रकरणी तक्रार नोंंदवण्यात आली होती.

काय म्हणाले तहसीलदार?
- एका समाजिक कार्यकर्त्याने 10 सप्टेंंबरला कपिल आणि त्याच्या शेजारी राहाणार्‍या लोकांंविरुद्ध अंंधेरीचे प्रभारी तहसीलदार शिवाजी चौरे यांच्याकडे तक्रार नोंंदवली. कपिलवर एन्व्हानमेंट प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वृक्षतोड केल्याचा आरोप आहे.
- चौरे म्हणाले की, कपिल व त्याच्या शेेजारी राहाणार्‍या लोकांंनी मुंंबई हायकोर्टचा नियम आणि एन्व्हार्नमेंंट प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन केले आहे. कपिलने 400 मीटर जागेेवरील झाडांंना नुकसान पोहोचवले आहे.
काय आहे प्रकरण?
- गेल्या आठवड्यात बीएमसी इंजिनिअर अभय जगताप यांनी ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी कपिल आणि इरफान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
- तक्रारीत म्हटले आहे, की कपिलने 9th फ्लोअरवरील त्याच्या फ्लॅटमध्ये बेकायदा बांधकाम केले आहे. याच बिल्डिंगच्या 5th फ्लोअरवर इरफानचा फ्लॅट आहे.
- पोलिसांनी दोन्ही अभिनेत्यांसह बिल्डरविरोधात महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग अॅक्ट (एमआरटीपी), 1996 च्या कलम 53 (7) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
- जर हे आरोप सिद्ध झाले तर दोन्ही सेलिब्रिटीजना एक महिना ते तीन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यासोबत 2000 ते 5000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

पुुढील स्लाइडवर वाचा, कपिल- इरफानवर FIR, आरोप सिद्ध झाले तर 3 वर्षांपर्यंत होऊ शकते कैद
बातम्या आणखी आहेत...