मुंबई: "बिग बॉस'च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक मॉडेल पूजा मिश्रा हिने बहूचर्चित बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनवर 100 कोटी रुपयांचा बदनामीचा दावा ठोकला आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सनीने आपली बदनामी केली, असा पूजाचा ओरोप आहे. सोमवारी या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होती. मात्र, याचिकाकर्ती पूजाच अनुपस्थित असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली. बिग बॉसच्या पाचव्या पर्वात पूजा स्पर्धक होती आणि तिच्यानंतर काही दिवसांनीच सनीचाही या शोमध्ये सहभाग झाला होता. दरम्यान, सनीने माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये पूजावर अनेक आरोप केले होते.
सनीमुळे माझे झाले 70 लाखांचे नुकसान...
- पूजाने आरोप लावले, की शहरातील एका वर्तमानपत्राला सनीने मुलाखत दिली होती. पूजा म्हणाली, 'त्या आर्टिकलमध्ये माझ्याविरोधात अनेक आरोप लावण्यात आले होते.'
- लोकांच्या नजरेत माझी प्रतिमा मलिन झाली आहे.
- सनी लिओनच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 500 (मानहानी) अंतर्गत खटला चालवण्यास अपील केले आहे.
- या प्रकरणात हायकोर्टात जूनमध्ये सुनावणी होणार आहे.
पुढे वाचा, कोण आहे पूजा मिश्रा...