आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूनमनेच केली स्वतःची पोलखोल, म्हणाली 'स्वतः लीक केले इंटीमेट सीन्स, सगळेच असे करतात'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्शिअल मॉडेल पूनम पांडे द वीकेंड या आगामी शॉर्ट फिल्ममध्ये झळकणारेय. सोमवारी आपल्या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पूनमने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी तिने कबुल केले, की ती कपूर किंवा खान घराण्यातील नसल्याने कॉन्ट्रोवर्सी निर्माण करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी शॉर्टकट पद्धतीचा अवलंब केलाय. पूनम म्हणते, लोक तिचा तिच्या तोकड्या कपड्यांवरुन आणि वादग्रस्त वक्तव्यांवरुन टोमणे मारत असतात. मात्र याकडे ती दुर्लक्ष करत असते. विशेष म्हणजे यावेळी पूनमने स्वतःचीच पोलखोल केली. प्रसिद्धीत राहण्यासाठी स्वतःच सिनेमातील इंटीमेट सीन्स इंटरनेटवर लीक केल्याचे तिने यावेळी कबुल केले.

प्रसिद्धीत राहण्यासाठी निर्माण करते वाद...
पूनम सांगते, "मी लो बॅकग्राउंडमधून आली आहे. माझे नाते खान किंवा कपूर घराण्याशी नाहीये. इथवर मी स्वबळावर पोहोचली आहे. पूर्वी लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी मी स्वतः वाद ओढवून घेत असे. आता मी बाहेर नव्हे तर सिनेमात (द वीकेंड) वाद निर्माण करु इच्छिते. वर्ल्ड कप ड्रामापासून ते आतापर्यंत जेवढेही वाद मी निर्माण केले, ते सिनेमात काम मिळवण्यासाठीच होते. लोक मला शॉर्टकट का अवलंबते, असा प्रश्न विचारतात. मी त्यांना केवळ एकच म्हणते, माझी मर्जी."

माझा सिनेमा पॉर्न नाहीये..
आपल्या या नवीन सिनेमाविषयी पूनमने सांगितले, "मी आयुष्यात जे काही केले, त्यामुळे मी आनंदी आहे. मी एका सिनेमात काम केले, त्यामुळे निर्माते खुश आहेत. हा पोर्न सिनेमा नाहीये. हा एक हॉरर सिनेमा आहे. पण यामध्ये पूनम पांडे असल्याने हॉटनेसचा तडकासुद्धा नक्कीच असणारेय."

सिनेमा लीक झाल्याविषयी...
पूनमने सांगितले, की लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार स्वतः आपले सिनेमे लीक करतात. काही दिवसांपूर्वी पूनमच्या या शॉर्ट फिल्ममधील काही बोल्ड सीन्स लीक झाले होते. याविषयी पत्रकाराने पूनमला विचारले असता, ती म्हणाली, मी खोटं बोलणार नाही. मी स्वतः हे सीन्स लीक केले होते. ही एक प्रमोशन स्ट्रॅटेजी आहे. आज ए लिस्टर्सपासून सगळेच लोक असे करतात. मीसुद्धा केले, त्यात गैर ते काय.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, द वीकेंड या सिनेमाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये क्लिक झालेली पूनमची छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...