आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनयच नव्हे, दमदार आवाजासाठीही ओळखले जातात शत्रुघ्न, वाचा 9 फेमस डायलॉग्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये शॉटगनच्या नावाने प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी वयाची 71 वर्षे पूर्ण केली आहेत. 9 डिसेंबर 1945 रोजी पटना (बिहार) येथे त्यांचा जन्म झाला. प्रेम पुजारी हा त्यांनी साईन केलेला पहिला बॉलिवूड सिनेमा होता. देव आनंद या सिनेमाचे दिग्दर्शक होते. मात्र हा सिनेमा उशीरा रिलीज झाला. त्यामुळे 1969 मध्ये रिलीज झालेला 'साजन' हा त्यांचा डेब्यू सिनेमा समजला होता.

'साजन'नंतर त्यांनी 'मेरे अपने' (1971), 'सबक' (1973), 'दोस्त' (1974), 'कालीचरण' (1975), 'विश्वनाथ' (1978), 'दोस्ताना' (1980), 'क्रान्ति' (1981), 'नरम गरम' (1981), 'कैदी' (1984), 'ज्वाला' (19869), 'खून भरी मांग' (1988), 'आन : मॅन एट वर्क' (2004) आणि 'रक्त चरित्र' (2010) यासह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. शत्रुघ्न यांना केवळ अभिनयासाठीच नव्हे तर आपल्या दमदार आवाजासाठीही ओळखले जाते. त्यांचे अनेक संवाद प्रसिद्ध झाले आहेत. आजही त्यांच्या खास शैलीतील खामोश सह अनेक संवाद प्रेक्षकांच्या ओठी असतात.

divyamarathi.com वाचकांना शत्रुघ्न यांच्या काही गाजलेल्या संवादांविषयी सांगत आहे, ते तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये वाचू शकता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...