आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Prabal Baruah Is One Of The Successful Directors When It Comes To Indian Television

\'CID\'चे दिग्दर्शक आता करत आहेत सिनेसृष्टीत पदार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत प्रबल बरुआ. 'सीआईडी', 'अदालत' आणि 'गुटर गूं'  या गाजलेल्या मालिकांचे श्रेय त्यांना जाते. टेलिव्हिजन शोजनंतर आता प्रबल बरुआ सिनेसृष्टीकडे वळले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आजवर सस्पेन्स थीमवर टीव्ही शोज करणारे प्रबल आता याच थीमवर सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.
 
याविषयी प्रबल यांनी मीडियाला सांगितले, की ते गेल्या 20 वर्षांपासून इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. आता सिनेमांमध्ये नशीब आजमावयला हवे. त्यांच्या सिनेमाचे शीर्षक 'स्ट्रॉबेरी प्वाइंट' असून हा एक साइकोलॉजिकल थ्रिलर आहे. 'बॅण्ड ऑफ बॉइज' फेम सिंगर करण ओबेरॉयला त्यांनी या सिनेमासाठी साइन केले आहे.
 
गायकसोबतच करण एक अभिनेतासुद्धा आहे. 2008 साली आलेल्या 'जिंदगी बदल सकता है हादसा' या टीव्ही शोमध्ये करण झळकला होता. करणविषयी प्रबल सांगतात, "मला माझ्या फिल्मसाठी असा एक अभिनेता हवा होता, जो या प्रोजेक्टसाठी त्याचे सहा महिने देऊ शकले. तसंही हा माझा पहिला सिनेमा आहे, त्यामुळे बजेटकडे मला लक्ष द्यावे लागले. करण माझा खूप चांगला मित्र आहे. विशेष म्हणजे तो या सिनेमासाठी मानधन घेत नाहीये."
 
या सिनेमात अभिनय करण्यासोबतच करण याचा को-प्रोड्यूसरसुद्धा आहे. सिनेमात त्याची भूमिका एका क्रिमिनल लॉयर असून त्याचे नाव अनिरुद्ध आहे. तो आपल्या बेपत्ता पत्नीच्या शोधात असतो. सिनेमाचे चित्रीकरण पंचगनी येथे सुरु आहे.  अद्याप या सिनेमाची रिलीज डेट निश्चित झालेली नाही.  
बातम्या आणखी आहेत...