आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलीजपूर्वीच \'बाहुबली 2\'ने कमावले 500 कोटी, वाचा कुठून-कुठून झाली ही कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक एसएस राजामौली आणि प्रभास यांच्या बहुप्रतिक्षित 'बाहुबली 2' या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच कमाईचा नवा रेकॉर्ड बनवला आहे,. सिनेमाने रिलीजपूर्वीच वितरक आणि चित्रपटगृह अधिकारांच्या माध्यमातून 500 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाचे तामिळ, तेलगु, हिंदी आणि दुस-या व्हर्जनसाठी वितरकांनी मोठी रक्कम चुकवली आहे. 

हिंदीत करण जोहरने घेतली रिलीजची जबाबदारी... 
‘बाहुबली 2’ हा सिनेमा तेलगु, तमिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या हिंदी भागाची सर्व जबाबदारी करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनतर्फे घेण्यात आलेली आहे. यासाठीच ‘बाहुबली’ या सिनेमाच्या चित्रपटगृह अधिकारांसाठी घसघशीत रक्कम मोजण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बाहुबली- द बिगिनींग’ या सिनेमाच्या हिंदी भागासाठी 120 कोटी रुपयांना सिनेमाचे काही हक्क विकण्यात आले होते. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाहुबली’ हा हिंदी भाषेत ध्वनिमुद्रित झालेला आणि बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला मिळवणारा पहिलाच सिनेमा ठरला होता.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, बाहुबली 2ने नॉर्थ अमेरिकन राइट्सच्या माध्यमातून केली 45 कोटींची कमाई...
 
बातम्या आणखी आहेत...