आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काबरोबर नव्हे, या बिझनेसमॅनच्या नातीशी लग्न करू शकतो प्रभास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - प्रभास आणि अनुष्का शेट्टी यांच्या लग्नाच्या अफवा अजूनही सुरुच आहेत. पण आता प्रभास दुसऱ्या एका तरुणीशी विवाह करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रासी सिंमेंटचे चेअरमन भूपती राजू यांनी त्यांच्या नातीबरोबर प्रभासचे लग्न व्हावे यासाठी बोलणी सुरू केली आहे. मात्र याबाबत अद्याप प्रभास किंवा त्याच्या कुटुंबाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रभास सध्या यूएसला गेलेला असून तो लवकरच परतणार आहे. 

यापूर्वी प्रभास आणि अनुष्का यांच्या अफेयर आणि दोघांच्या लग्नाबाबत अनेक अफवा आल्या आहेत. एका रिपोर्टमध्ये तर प्रभासने 'बाहुबली'साठी अनुष्काचे लग्न लांबवले असेही वृत्त दिले होते. त्याने स्वतःचे लग्नही 5 वर्षांसाठी टाळले होते, असे सांगण्यात आले होते. 

अनुष्का म्हणाली माझ्याच टीम मेंबरने पसरवली अफवा 
काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात अनुष्का म्हणाली होती, मी कोणत्याही अॅक्टरबरोबर काम केले तरी माझे त्यांच्याबरोबर नाव जोडले जाते. रिपोर्ट्सनुसार ही अफवा त्यांच्या टीममधील एखाद्याने पसरवी असल्याचे अनुष्काचे म्हणणे आहे. अनुष्काने त्या व्यक्तीची चांगलीच खरडपट्टी काढल्याचेही समोर येत आहे.
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अनुष्का आणि प्रभास यांच्याबाबत... 

 
बातम्या आणखी आहेत...