आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prabhas Will Not Feature In Baahubali 3 Reporters

बाहुबली 3 मधून \'बाहुबली\'लाच डच्चू मिळण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाहुबली- द बिगनिंग' या गाजलेल्या चित्रपटात दाक्षिणात्य स्टार प्रभास राजू उप्पालपटी याची प्रमुख भूमिका होती. याच्या बळावर तो अवघ्या देशभरात पोहोचला. त्यापूर्वी त्याची ओळख एक दक्षिणेताल स्टार अशीच होती. आता बाहुबलीचा सिक्वेल यावर्षीच्या अखेरीस येणार आहे. त्याची प्रेक्षकांना उत्सूकता लागलेली आहे. त्यात प्रभासची भूमिका बघण्यासाठी सगळे आतूर आहेत. पण या दरम्यान हाती आलेल्या वृत्तानुसार बाहुबलीचे निर्माचे एस. एस. राजमौली यांनी बाहुबली भाग तीनचीही तयारी सुरु केली आहे. यात मात्र प्रभासला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते नाराज झाल्याशिवाय राहणार नाही.
दक्षिणेतील एका आघाडीच्या मासिकाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार बाहुबली भाग तीनची संपूर्ण स्टोरी जरा वेगळ्या धाटणीची असेल. ती पहिल्या दोन भागांवर आधारित नसेल. विशेष म्हणजे बाहुबलीचे लेखक विजयेंद्र प्रसाद यांनी तिसऱ्या भागाची स्टोरी लिहिण्यास सुरवात केली आहे. यात प्रभाससह पहिल्या दोन भागातील अनेक महत्त्वपूर्ण कॅरेक्टर्स राहणार नाहीत. म्हणजेच एक नवीन तेवढीच खुसखुशीत स्टोरी बाहुबली तीनमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
राजामौली यांनीच बाहुबली भाग तीनसंदर्भात काही माहिती ट्विटरवर दिली आहे. पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, काय म्हणालेत ते....