आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prakash Jha\'s \'Qaidi No 210\' Focus On Salman\'s Blackbuck Case

सलमानच्या \'काळवीट शिकारी\'वर येणार सिनेमा, \'कैदी नंबर 210\' नावाने घालवले होते 72 तास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- उस्मान खान आणि महेश सैनी)
मुंबई- सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणावर सिनेमा बनवण्यात येत आहे. सलमानने 2006मध्ये जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात 72 तास घालवले होते. सिनेमा याच 72 तासांवर आधारित आहे.
सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावर तयार होणा-या या सिनेमाचे नाव 'कैदी नंबर 210' आहे. सोमवारी (16 फेब्रुवारी) मुंबईच्या फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये याचा पहिली शूटिंग करण्यात आली. या सिनेमामध्ये उस्मान खान मुख्य भूमिका साकारत आहे. तुरुंगात सलमानसोबत दुसरा कैदी महेश सैनी होता. त्यामुळे या सिनेमात तो स्वत:सुध्दा काम करू शकतो. हा त्याचा पदार्पणाचा सिनेमा असेल. 'कैदी नंबर 210'चा निर्माता रंजीत शर्मा आहे. सिनेमाचे एडिटर प्रकाश झा यांनी सांगितले, की सिनेमाची कहानी मुंबईपासून सुरु होऊन जोधपूरला संपेल. सलमान जोधपूर तुरुंगात असताना त्याला 'कैदी नंबर 210' नाव देण्यात आले होते.
बातम्यांनुसार, शिकारदरम्यान ज्या जिपचा वापर करण्यात आला होता, तिच जिप सिनेमात वापरली जाणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातील काही शॉट्स...