आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांपासून ड्रग्सच्या जाळ्यात अडकला होता स्मिता पाटील यांचा मुलगा, स्वतः दिली कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेते-राजकारणी राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर अचानक चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे प्रतीकचा अलीकडेच रिलीज झालेला एक व्हिडिओ. ‘दिल से आझाद’ हे त्याच्या व्हिडिओचे नाव असून यात त्याने अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे त्याला कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता, हे सांगितले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने तो अंमली पदार्थांच्या आहारी गेल्याची कबुली दिली होती. 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या प्रतीकने सांगितले, की एकामागून एक सिनेमे फ्लॉप झाल्याने आणि अभिनेत्री एमी जॅक्सनसोबतच्या ब्रेकअपमुळे तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. पण आता तो यातून सावरला आहे. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, ड्रग्स अॅडिक्शनविषयी काय म्हणाला प्रतीक आणि सोबतच बघा, त्याचा व्हिडिओ शेवटच्या स्लाईडवर..  
बातम्या आणखी आहेत...